तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्यावर झालेली दयनीय अवस्था पाहाता तेल्हारा तालुका वकिल संघटनेकडुन बेमुदत साखळी उपोषण दि.१८ ऑक्टोबर पासुन सुरु केलेले आहे. या रस्त्याकरीता अनेक संघटना पक्ष सामाजीक कार्यकर्ते पञकार यांणी आमरण उपोषन आंदोलने केलीत. यामध्ये सामाजीक आंदोलनान संघाचे प्रमुख चंद्रकांत मोरे यांणी गाढव आंदोलन तर चद्रकांत मोरे, अजय गांवडे, सांदिप सोळंके, संदिप खारोडे, यांणी चक्क लोटांगन आंदोलन केले.
तसेच पञकार विशाल नांदोकार आमरण उपोषन केले. त्यांचे उपोषन सोडविण्यासाठी पालकमंञी बच्चुभाऊ कडु आले परंतु त्यांणीही पाहीजे. त्या प्रमाणात दखल न घेतल्याने या रस्त्याच्या कामाकरीता न्यायालयात दाद मागण्यासाठी वकिल संघटना पुढे आली आहे. हि बाब तालुका वाशींया करीता खुप महत्वाची आहे. जो न्यायीक लढा लढण्यासाठी आपल्याला खर्च येतो. तो लढा लढण्यासाठी वकिल संघटना पुढे आली. त्यांचे आपण सर्वा़नी अभिनंदन तर केलेच पाहीजे. आणी त्यांणा आपले समर्थन सुध्दा दिले पाहीजे.
या रस्त्याचे काम लवकरात लवकर चालु व्हावे. या करीता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेवुन मुख्यमंञी यांचेपर्यत हि मागणी पोहचवायला पाहीजे. जो पर्यंत तालुक्यातील जनता एकञ येणार नाही आणी आणी याला समर्थ देणार नाही. तो पर्यंत लोक प्रतिनिधी आणी प्रशासनला जाग येणार नाही. वकिल संघनेकडुन या सभदर्भात न्यायालयात याचीका दाखल करण्याची तयारी चालु आहे. परंतु तालुक्यातील नागरीकांनी व ग्रामपंचायत यांणी ठराव घेवुन वकिल संघटनेला समर्थ द्यावे असे आवाहन ग्रामपंचायत ईसापुरच्या वतिने सरपंच मिराताई आऩंद बोदडे यांणी केले आहे. यावेळी, उपसरपंच महादेवराव नागे, जयश्रीताई खंडुजी घाटोळ कमलबाई घोडस्कार, पञकार आनंद बोदडे खंडुजी घाटोळ उपस्थीत होते.