अकोट (देवानंद खिरकर):- अकोला जिल्हा कृषी अधिक्षक खोत साहेब यांनीं बोर्डी गावला सादिच्छ भेट दिली. हा त्यांचा नियोजित दोरा होता. त्या दौर्या दरम्यान बोर्डी ग्रामपंचायत मध्ये भेट दिली. ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना पिक विमा, सफेदमुसळी, संत्रा गळण अश्या शेतीमध्ये येणाऱ्या समस्या सांगितल्या त्यावेळी त्यांना लिखित स्वरुपात निवेदन देण्यात आले आणी बरेच अडचणी सांगण्यात आल्या.
लवकरच या कामांची दखल घेवुन कामे पुर्ण करु असे. आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यावेळी तालुका कृषि अधिकारी शुशांत शिदे, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी शात्रंज्ञ थुल, आत्मा समितीचे मोगरे, कृषी सहायक ईश्वर बैरागी, कृषी सहायक ठाकरे, बोर्डीतील शेतकरी लटकुटे, अनिल आतकड, मो. साजिद, रमेश राऊत, समाधान चंदन, बबलु धर्मे, प्रमोद काळणे, नंदलाल राँय, विनोद गये, रामदास राऊत, अनिल खिरकर, धनराज धर्मे, विजय ताडे, रवी वाघमारे, विष्णू पखाले, राजेश खिरकर, विठ्ठल लाहोरे, सचीन अंबळकार, राजु वाघमारे आदी उपस्थित होते.