अकोला : महाराष्ट्रात चित्रपट क्षेत्रातील अभिनेते व त्यांचे मुलांचे अमली पदार्थाचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी मायानगरी पासून पाचशे कि.मी. पेक्षा अधिक दूर असलेल्या विदर्भातील अकोला शहरात अर्धा किलो ब्राऊन शुगर आढळली. त्याची किंमत सात लाख ५० हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट फैल परिसातील एका घरातून ही ब्राऊन शुगर जप्त केली.
अकोला शहरातील अकोट फैल पोलिस स्टेशनच्या हद्दीत अफजल खान खलील खान वय २२ वर्ष या युवकाच्या घराची झाडाझडती घेतली असतानन अमलीपदार्थ ब्राऊन शुगर जप्त केले. त्याची बाजार मूल्य सात लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीकडील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, ब्राऊन शुगर प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, ए. एस. आय गोपीलाल मावळे, गणेश पांडे, अनिता टेकाम, गीता अवचार, फिरोज खान, संदीप काटकर, शक्ती कांबळे, उदय शुक्ला, पवन यादव आदींनी केली.