मुंबई: येत्या 20 ऑक्टोबरपासून मुंबईतील विद्यापीठे (universities) आणि वरिष्ठ महाविद्यालये (colleges) सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना सुरू करण्यासाठी परिपत्रक (Circular) जारी केलेत. 20 ॲाक्टोबरपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठानं एसओपी जाहीर केलेत. महाविद्यालय खुले होणार पण वसतिगृह खुल्याकरण्या बाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे. पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात 50 टक्के आसन क्षमतेने स्थानिक प्राधिकारच्या आणि विद्यापिठाच्या सहमतीने वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांनाच परवानगी देण्यात येईल. महाविद्यालय सुरू करताना कोरोना प्रादुर्भाव रूग्ण संख्या याचा आढावा स्थानिक प्रशासन , महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संयुक्त विचारविनिमय करून घेता येईल. कोरोना व्यवस्थापनाचे राज्य सरकारने आणि आयसीएम आर गाईडलाईन्सची अंमलबजावणी करत महाविद्यालय सॅनिटाइझ करणे स्वच्छता राखणे सुरक्षित अंतर मास्क या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. Amazon Driver ते World Cup Star: स्कॉटलंडच्या ऑल राऊंडरचा आहे थक्क करणारा प्रवास वसतिगृह सुरू करण्याबाबत निर्णय टप्प्याटप्प्याने आढावा बैठक घेऊन घेतला जाईल. लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येणे शक्य नसेल त्यांना ॲानलाईनचा पर्याय खुला असेल.