• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

MS Dhoni : ‘अजून मैदान सोडलं नाही’, IPL मधून निवृत्तीच्या चर्चांना धोनीकडून पूर्णविराम!

Our Media by Our Media
October 16, 2021
in क्रीडा, राज्य
Reading Time: 1 min read
103 3
0
ms dhoni
16
SHARES
757
VIEWS
FBWhatsappTelegram

IPL 2021 Final : IPL 2021 चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं आयपीएलमधील निवृत्तीबाबतच्या चर्चांवर भारी उत्तर दिलंय. अंतिम सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला याबाबत विचारलं असता धोनीनं मिश्किलपणे हसत म्हटलं की, आपण अजून सोडलेलं नाही… धोनीच्या या उत्तरानंतर तो पुढील आयपीएलमध्येही खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हर्षा भोगले यांनी धोनीला विचारलं की, आपण मागे सोडून जात असलेल्या वारशाचा तुला अभिमान वाटत असेल? यावर धोनीनं हसत म्हटलं की, आपण अजून सोडलेलं नाही!

IPL 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात कोलकाता संघ निर्धारित 20 षटकांमध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला. चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, आकडेवारी पाहिली तर कामगिरीत सातत्य राखणाऱ्यांमध्ये आम्ही प्रथम आहोत, पण आम्ही अंतिम सामन्यातही पराभूत झालो आहोत. विरोधी संघाला संधी न देणं या गोष्टीत जाणुनबुजून सुधारणा करण्यात आली. आगामी वर्षांमध्ये चेन्नई त्यासाठी ओळखली जाईल अशी आशा आहे. खासकरुन प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा होते. जेव्हा तुम्ही टीम रुममध्ये बोलता तेव्हा दबाव निर्माण होतो. तुम्ही चांगल्या संघाशिवाय चांगली कामगिरी करु शकत नाही. आमच्याकडे चांगले खेळाडूही आहेत, असं धोनी म्हणाला.

धोनी म्हणाला की, मला चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. आम्ही सध्या दुबईत आहोत. मात्र जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होतो तेव्हाही मोठ्या प्रमाणात चाहते होते. जणू काही आम्ही चेपॉक, चेन्नईत खेळत आहोत असं वाटत होतं, असंही धोनी म्हणाला. कोलकात्याच्या संघाचंही धोनीनं कौतुक केलं. तो म्हणाला की, मी चेन्नईबद्दल बोलण्यापूर्वी, मी कोलकाताबद्दल आधी बोलेन. दबावात असताना पुनरागमन करणं कठीण असतं. मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली. जर आयपीएल जिंकण्यासाठी कोणता संघ पात्र असेल तर तो कोलकाता आहे, असं धोनी म्हणाला.

Tags: IPLMS Dhoni
Previous Post

BLOG: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर ‘मातोश्री’वरचा फोन खणाणला, अन्…

Next Post

पंचगव्हाण येथील प्रा.आ. केंद्रात सौरभ वाघोडे यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन कॉन्स्टनट्रेटर सुविधा उपलब्ध

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
पंचगव्हाण येथील प्रा.आ.केंद्रात सौरभ वाघोडे

पंचगव्हाण येथील प्रा.आ. केंद्रात सौरभ वाघोडे यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन कॉन्स्टनट्रेटर सुविधा उपलब्ध

पालकमंत्री बच्चू कडू

दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या - पालकमंत्री बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.