नवी दिल्ली : आयटी हब असलेला गुरूग्राम भाग काल (दि.०८) बेछुट गोळीबारांच्या घटनांनी हादरलेला पहायला मिळाला. (Crime in Gurugram) तब्बल दोन तासांच्या अंतराने हा प्रकार घडला. वेगवेगळ्या प्रकरणातील या गोळीबारात तीन लोकांना गोळी लागल्याचे समोर आले आहे.
यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. पहिला प्रकार मेडिकल युनीव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रेमप्रकरणातून हा गोळीबार झाला आहे. तर पटौदी भागात एका हॉटेलमध्ये दोघांना गोळी लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या दोन्ही प्रकरणांचा पोलिस कसून तपास करत आहेत.
सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरूग्राममध्ये तब्ब्ल गोळीबाराचा थरार सुरू होता. दरम्यान दोन्ही घटनेतील आरोपी फरारी आहेत. पोलिस यांचा तपास करत आहेत. दोन्ही घटनेत दोन तासाच्या फरकाने दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Crime in Gurugram : पहिली घटना एका हॉटेलमध्ये
पहिली घटना गुरूग्रामच्या पटौदी पोलिस स्थानक परिसरातील जमालपूर गावात धीरज हॉटेलमध्ये घडली. या हॉटेलच्या दारात एक बोलेरो कारमधून ६ मानसे उतरून बेछुट गोळीबार केला यामध्ये दोघांना गोळ्या लागल्या. परंतु, एका व्यक्तीला दोन गोळ्या लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान अद्यापही आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
दुसरी घटना विद्यापीठाच्या आवारात
तर दुसऱ्या घटनेत गुरूग्राम येथील मेडिकल युनिव्हर्सीटीच्या आवारातील आहे. मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांवर लॉचा अभ्यास करणाऱ्या मुलाने थेट गोळीबार करत हत्या केली. हा गोळीबार प्रेमप्रकरणातून असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील आरोपीही अद्याप फरारी आहे.
विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच दिवसा वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची कायद्याच्या विद्यार्थ्याने गोळ्या घालून हत्या केली. वैद्यकीय विद्यार्थ्यावर प्रेम प्रकरणावरून गोळ्या घातल्या गेल्या.
हत्येनंतर आरोपी विद्यार्थी त्याच्या बुलेट बाईकवरून पळून गेला. विनीत गौतम हा BAMS च्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
काल दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्याने कॅम्पसच्या पार्किंगमध्ये त्याला गोळी झाडली. यामध्ये गोळी लागलेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.