अकोला: दि.८: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना तीन लाख रुपयांच्या आतील कामांचे वाटप करण्याकरिता अध्यक्ष, जिल्हा काम वाटप समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांचे अध्यक्षेतेखाली गुरुवार दि.१४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांचे दालनात ही बैठक होणार आहे.
आस्थापना अधिकारी, सेवा व वस्तू कर कार्यालय अकोला यांचे कडून बैठकीमध्ये शासन निर्णयान्वये तीन लाख रुपयांच्या आतील प्रस्तावित कामाचे वाटप करण्यांत येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था सोसायट्यांनी आपली सेवा सहकारी संस्था सोसायटी प्रस्तावित काम करण्यास इच्छूक तसेच जिल्हा काम वाटप समीतीच्या पात्रते (अटी व शर्थी) नुसार पात्र असल्यास त्यांनी आपला प्रस्ताव प्राथमिक छाननी करीता बुधवार दि. १३ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार होणार नाही. काम वाटपाबाबत अंतिम निर्णय जिल्हा काम वाटप समितीचा राहील.तरी जिल्हा काम वाटप समितीच्या अटी व शर्थीस पात्र असल्यास संस्थांनी आपले प्रस्ताव दि.१३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन सदस्य सचिव काम वाटप समिती तथा सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.