अकोला: दि.7: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्राकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेवून अंतिम निर्णय जाहीर केला असून आक्षेप व निर्णय सूची जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर www.akola.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
याबाबत आक्षेप व तक्रार असल्यास ते लेखी आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालय येथील महाआयटी कार्यालय येथे शुक्रवार दि. 8 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावे. यानंतर प्राप्त होणारे कोणत्याही तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच शनिवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता आक्षेप, तक्रार व विनंती सुनावणीसाठी उपस्थित राहावे. निवडसूचीमध्ये ज्या ग्रामपंचायत मधील अर्जदारांना मुलाखतीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले होते त्यांनी देखील उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.