• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

कोरोनाची तिसरी लाट दसरा दिवाळीनंतर शक्य; लसीकरण वेगाने

Our Media by Our Media
October 7, 2021
in कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
137 1
0
कोरोना
21
SHARES
988
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रचंड मनुष्यहाणी झाल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असे म्हटले जात होते. मात्र, सर्व व्यवहार खुले झाल्यानंतर दसरा आणि दिवाळीनंतर राज्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

दीड वर्षांत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली. या लाटेदरम्यान अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढला आहे. सध्या राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार नाही, असे म्हटले जात होते. बहुतांश नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे लागण झाली तरी बरे होण्याचा वेग वाढत आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

राज्यात आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून सर्व मंदिरे प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व मंदिरांत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

यात १५ ऑक्टोबरपर्यंत वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही, अशी काळजी या कालावधीत घेतली जाईल. राज्यात उद्यापासून दररोज १५ लाख लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या राज्यात एक कोटी लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

गंभीर परिणाम होणार नाही

टोपे म्हणाले, ‘दसरा आणि दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवरच आपण विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत. लसीकरण हाच आपल्याकडे मोठा पर्याय आपल्याकडे आहे. मालेगावसारख्या ठिकाणी अद्याप लसीकरण झालेले नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य घेऊ.’

Tags: COVID-19Mumbai
Previous Post

क्रेडीट आऊटरिच अभियान: कर्ज योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हाच अभियानाचा उद्देश; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ; दि.१४ ला होणार तक्रार निवारण

Next Post

दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
crime

दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक

COLLECTOR MEETING

कोविड लसीकरणासाठी आजपासून मिशन कवच कुंडल अभियान; दररोज 20 हजारांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.