• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

क्रेडीट आऊटरिच अभियान: कर्ज योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हाच अभियानाचा उद्देश; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ; दि.१४ ला होणार तक्रार निवारण

Our Media by Our Media
October 7, 2021
in अकोला, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
100 2
0
credit Out reach programm
20
SHARES
725
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.७: लहान व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसहाय्याच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यात महत्त्वाची भूमिका ही बॅंका व वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या पतपुरवठ्याची असते. या योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा या क्रेडीट आऊटरिच अभियानाचा उद्देश आहे. कर्ज योजनांची माहिती देण्यासोबतच येत्या १४ तारखेला सामान्य नागरिकांच्या कर्ज मिळण्यासंदर्भातील अडीअडचणीही ऐकून घेतल्या जातील, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले.

क्रेडीट आऊटरिच अभियानास जिल्ह्यात आज सुरुवात करण्यात आली. जिल्हास्तरावरील कार्यक्रम आज पार पडला. आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येईल. आज झालेल्या मुख्य सोहळ्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा, सेंट्रल बॅंक ऑफ इंडीयाचे क्षेत्रीय प्रबंधक चंद्रभान गुप्ता, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रबंधक अभिजित चंदा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, नाबार्डचे शदर वाळके, दीनदयाळ अंत्योदय अभियान शहर व्यवस्थापक गणेश विलेवार, जिल्हा अग्रणी बॅंकेचे आलोक तेराणीया आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमात जमलेल्या महिला आर्थिक बचत गट, तसेच लहान उद्योजक, व्यावसायिक यांना शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा साधन व्यक्ती पवन काबरा यांनी बॅंकांमार्फत वितरीत होणाऱ्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. शहरी भागातील लोकांना समुह गट उद्योगांबाबत माहिती देण्यात आली. खादी ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, कोणते विभाग कोणत्या योजना राबवितात. त्या योजनांना कसे अर्थसहाय्य मिळते. त्याचे निकष काय, प्रकल्प अहवाल कसे तयार करतात, बॅंक प्रकरण तयार करतांना ते कसे करतात याबाबत लोकांना माहिती करुन देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याच प्रमाणे लोकांना बॅंकांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत याच अभियानाचा भाग म्हणून दि.१४ तारखेला जिल्हा नियोजन भवनात तक्रार निवारणासाठी कार्यक्रम घेण्यात येईल,असेही श्रीमती अरोरा यांनी यावेळी सांगितले.

याच कार्यक्रमात बॅंकाकडून कर्ज घेऊन यशस्वी व्यवसाय करणारे स्वयंसहाय्यता बचत गट, खाजगी व्यावसायिक, उद्योजक यांचा सत्कार करुन त्यांचे यशकथा कथनही करण्यात आले. तसेच ज्या बचत गटांना व व्यावसायिकांना कर्ज मंजूर झाले त्यांना कर्ज मंजूरी पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाचे जिल्हा माहिती कार्यालयाने फेसबुकवरुन लाईव्ह प्रसारण केले होते. तसेच जिल्हा सुचना विज्ञान केंद्राने यु ट्युबवरुन लाईव्ह प्रसारण केले. त्यासाठी जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, निखिल वानखडे, प्रशांत गावंडे, शुभम थोरात यांनी तर जिल्हा माहिती कार्यालयाचे सतिश बगमारे, हबीब शेख, सुनिल टोमे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत पदवाड यांनी केले.

Tags: AkolaCredit Outreach
Previous Post

It Raids Ambalika Sugers : अजित पवारांच्या कर्जत अंबालिका कारखान्यावर आयकरचे छापे

Next Post

कोरोनाची तिसरी लाट दसरा दिवाळीनंतर शक्य; लसीकरण वेगाने

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोरोना

कोरोनाची तिसरी लाट दसरा दिवाळीनंतर शक्य; लसीकरण वेगाने

crime

दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.