अकोला: दि.६: राज्य विधीमंडळाची रोजगार हमी योजना समिती सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वा. जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, पंचायत समिती सभापती यांच्याशी रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत चर्चा. सकाळी १० ते ११ जिल्ह्यातील जनतेकडून व स्वयंसेवी संस्थांकडून रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा- स्थळ- शासकीय विश्राम गृह अकोला. सकाळी ११ ते सायं. सहा पर्यंत रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा.
मंगळवार दि.१२ ऑक्टोबर- सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच दरम्यान रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा.
बुधवार दि.१३ ऑक्टोबर- सकाळी साडेनऊ वा. रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी, तसेच या संदर्भात समितीने पाठवलेली प्रश्नावली व समितीने कामांना दिलेल्या प्रत्यक्ष पाहणी भेटीत आढळलेल्या त्रुटी इ. बाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (रोहयो), उपायुक्त(रोहयो), उपजिल्हाधिकारी (रोहयो) व ही योजना राबविणाऱ्या कार्यान्वयन यंत्रणेचे विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याबाबत बैठक- स्थळः जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
दुपारी दीड ते अडीच वा. पर्यंत राखीव. दुपारी अडीच वा. पासून चर्चा पुन्हा सुरु. चर्चेनंतर दौरा समाप्त.