• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे पशू कल्याण व संवर्धनात योगदान

Our Media by Our Media
October 6, 2021
in अकोला
Reading Time: 2 mins read
86 1
0
world animal day
24
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

पृथ्वीवरील संपूर्ण प्राणिमात्रांच्या स्थिती मध्ये सुधार घडविणे आणि प्राणिमात्रांचे जीवन अधिकाधिक सुसह्य व सुखद बनविणे या उद्देशाने दि.४ ऑक्टोंबर हा दिवस जागतिक प्राणी दिवस तथा पशू कल्याण दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. दिवसेंदिवस पशुधनाचे महत्त्व वाढते आहे. हे महत्त्व आणि वैयक्तिक जागरूकता, शिक्षण यांच्या माध्यमातून एका अशा विश्वाचे निर्माण करणे जिथे मनुष्याच्या भावभावना विश्वासोबतच जनावरांच्या देखील भावना समजून घेणे आणि त्यांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत करणे हा उद्देश जागतिक प्राणी दिवस साजरा करण्या मागे आहे.

पार्श्वभुमीः-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दि.२४ मार्च १९४५रोजी जर्मनी मधील बर्लिन येथे स्त्री रोग विशेषज्ञ हेनरिक जिमरमन यांनी केली. त्यावेळी बर्लिन येथील पशु दिवस कार्यक्रमांमध्ये पाच हजाराहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला याची नोंद आहे. पुढे कालांतराने १९२९ पासून २४ मार्च ऐवजी दि.४ ऑक्टोबर हा संत फ्रांसीस पर्वा सोबत जोडण्यात आला. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जातो.

पशुधन कल्याणाशी संलग्न असलेली नेचर वॉच फाउंडेशन ही जगभर प्रसिद्ध असलेली संघटना जगभरात हा दिवस साजरा करण्यात पुढाकार घेते. त्यानिमित्ताने पशु कल्याण संघटन, सामुदायीक समूह, लहान मुले आणि तरुण तरुणी यांचे क्लब तसेच व्यवसाय आणि व्यक्ती संघटना संपूर्ण जगभर हा उत्सव साजरा करतात. ‘सर्व सृष्टी वर आणि प्राणीमात्रावर प्रेम करा’, हा संदेश आपल्या भारतीय संस्कृतीमध्येही सांगण्यात आला आहे.

भारतीय राज्यघटना आणि प्राणी हक्क संरक्षणः-

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारतीय राज्यघटनेत देखील ‘Neighbours Of Humans Are Animals’ मनुष्यमात्राचे सखे शेजारी म्हणून प्राण्यांचा उल्लेख करून घटनाकारांनी आपली प्राणीमात्रांविषयी वैश्विक जाणीव साऱ्या जगापुढे प्रस्तुत केली आहे .

भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ मध्ये Fundamental Right To Life या सदरात प्राण्यांचा जगण्याचा अधिकार मान्य केला आहे. याशिवाय, घटना कलम ५१ अ (ग) मध्ये सर्वोच्च न्यायालयाने Magana Carta Of Animal Rights चा अंतर्भाव करून प्राण्यांच्या जगण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. तसेच ५१ अ (ग) मूलभूत कर्तव्य मध्ये भारतीय नागरिकांनी प्राणीमात्रावर ( भूतदया ) दया दाखविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याशिवाय घटना कलम ४८ आणि ४८ अ मध्ये सर्व सरकारांनी राज्य व देश पातळीवर पशु कल्याणासाठी Animal Welfare Policies राबविण्याचे निर्देश घटनाकारांनी दिलेले आहेत. तसेच Prevention Of Cruelty To Animals Act ची निर्मिती १९६० साली झाली आहे. त्यानुसार विविध राज्यांमध्ये society for preventing of cruetly to Animals ( SPCA ) च्या निर्मितीस चालना मिळाली आहे.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांचे कार्यः-

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला ही संस्था पशुवैद्यकीय शास्त्र आणि पशुसंवर्धना शास्त्राचे वैज्ञानिक शिक्षण देणारे देशातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1969 साली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या देशातील नामांकित व अकोला महानगर वासी यांसाठी गौरवास पद असणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत झाली होती. या संस्थेने नुकतेच २०१९ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. सन २००० मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर PGIVAS ही संस्था माफसू ला संलग्नित करण्यात आली.

PGIVAS, म्हणजे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान या संस्थेने आपल्या Teaching, Research, Extension म्हणजेच शिक्षण संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून अहर्निशपणे वैज्ञानिक ज्ञानाचा प्रचार प्रसार करून अनेकानेक तज्ञ व नामवंत पशुवैद्यक शास्त्रज्ञ, संशोधक पशुधन विकास अधिकारी उद्योजक आणि समाज कार्यकर्ते निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. देशाच्या पशुधन विकास संशोधन विस्तार याशिवाय आर्मी, मिल्ट्री, नेव्ही एअरफोर्स मध्ये तसेच बँकिंग क्षेत्र व उद्योग जगात अनेकानेक नामवंत विद्यार्थी या संस्थेने घडविले आहेत.

या संस्थेचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून विविध क्षेत्रांमध्ये येथील विध्यार्थ्यांनी नामांकन प्राप्त केले आहे. ही खुपच अभिमानास्पद बाब आहे. सध्याचे सर संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत तसेच राष्ट्रीय सशस्त्र सीमा सुरक्षा बल प्रमुख डॉ. मिलिंद वसे, कर्नल डॉक्टर बल्लेवार, उद्योजक डॉ. शरद भारसाकळे असे अनेक प्रज्ञावंत नामवंत विद्यार्थी संस्थेने समाजाला दिले आहेत ही सर्व मंडळी पशुवैद्यकीय तसेच विविध सामाजिक, शासकीय निम शासकीय सेवा तसेच खाजगी उद्योगधंद्यामध्ये अग्रेसर असून देशसेवा व समाज सेवा करत आहेत.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था (PGIVAS ) अकोला या संस्थेचे कार्यालय मुर्तीजापूर रोड डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असून संस्थेच्या या कार्यालयांमध्ये पुढील पंधरा विभागांचा समावेश आहे व या पंधरा विकावा विभागांमध्ये सुमारे 100 हून अधिक स्थायी, अस्थायी कर्मचारी व अधिकारी अहर्निश पणे राबून संस्थेच्या भरभराटीस त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यामुळे ” वसुधैव कुटुंबकम ” ही भावना खऱ्या अर्थाने येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये ओत प्रोत भरून ओसंडून वाहत असल्याचे निर्दशनास येते. संस्थेच्या कार्याचा गौरव म्हणूनच अलेंबिक फार्मास्युटिकल या नामांकित औषध कंपनीने इ. स. 2020-21 माफसू अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारी संस्था असा गौरव करून संस्थेला कोविड सारख्या भीषण कार्यकाळात सर्वात जास्त कार्यरत असणारी पशुवैद्यकीय संस्था असे गौरविले आहे. या संस्थेचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुढील पंधरा विभाग त्यांच्या शिक्षक शास्त्रज्ञ व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह सतत कार्यरत असतात.

हे विभाग व त्यांची कार्य पुढील प्रमाणे नामोल्लेखित करता येतील

१) सहयोगी अधिष्ठाता (Associate Dean) यांचे कार्यालय

संस्थेतील इतर सर्व विभागांवर नियंत्रण सुसूत्रता समन्वय आणि संचलनाचे कार्य माननीय सहयोगी अधिष्ठाता यांचे असून ते त्यांच्या कार्यासाठी माफसू विद्यापीठाला जबाबदार आहेत. सर्व विभाग आणि विद्यापीठ व जनता पशुपालक विद्यार्थी इतरां सोबत समन्वय आणि जबाबदारी ही संस्था प्रमुख या नात्याने माननीय सहयोगी अधिष्ठाता यांची व त्यांच्या कार्यालयाची आहे.

२) पशू शरीर क्रियाशास्त्र विभाग (Animal Physiology)

या विभाग प्रमुखांमार्फत Teaching, Research, Extension विषयक कार्य पार पडल्या जातात. या व्यतिरिक्त स्टुडंट्स ऍडमिशन संबंधातील सर्व जबाबदाऱ्या अकॅडमिक सेल इन्चार्ज म्हणून या विभागाकडे आहेत अलिकडेच मुलींच्या राजमाता जिजाऊ वसतिगृहाचा अतिरिक्त कार्यभार या विभाग प्रमुखांकडे आलेला आहे. संपूर्ण देशातील 22 पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनी या वस्तीगृहात राहतात.

३) जीव रसायनशास्त्र विभाग (Vetrinary Biochemistry)

नेमून दिलेल्या Teaching, Research, Extension व्यतिरिक्त या विभाग प्रमुखांकडे संस्थेच्या मालमत्ता अधिकारी आणि उपहारगृह इन्चार्ज तसेच विविध बांधकाम विषयक सर्वच समिती सदस्य म्हणून या विभाग प्रमुखाकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जीव रसायन शास्त्र विभागाने डिसेंबर २०२० मध्ये ” उद्योजकता विकास ” ह्या अभिनव कार्यक्रमाची सुरुवात करून सर्वच पारंपारिक शेळी-मेंढी, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, वराह पालन आदि प्रशिक्षणाचे नामांतर उद्योजकता विकासामध्ये केले आहे.

याशिवाय उद्योजकता विकास कार्यशाळा, दारू नको दूध प्या,अंडी चिकन खाऊ या बर्ड फ्ल्यू टाळू या व अशा अनेक कार्यक्रमांमध्ये जीवरसायनशास्त्र विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

४)पशू पोषण व आहार शास्त्र विभाग (Animal Nutrition)

नेमून दिलेल्या कार्या व्यतिरिक्त हा विभाग विविध कार्यक्रम जसे शेळी-मेंढीपालन यावर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतो.या विभागाने प्रथमच इंटरनॅशनल वेबिनार आयोजित करून PGIVAS चे नावलौकिक जगभर केले. त्यामुळे जगभरातील लोक नकाशावर अकोला आणि PGIVAS ला ट्रोल करायला लागले. पशु पोषण व आहाराचा खूप महत्त्वाचा समावेश पशु उत्पादन वाढीसाठी होतो आणि त्या दृष्टीचे सर्व पोषण आहार विषयक मार्गदर्शनाचे कार्य हा विभाग उत्कृष्टपणे करत असून उद्योगधंद्यांना सल्ला आणि प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग व विभाग प्रमुख करत आहेत.

५) औषध निर्माण शास्त्र विभाग (Vetrinary Pharmacology)

नेमून दिलेल्या कार्या व्यतिरिक्त हा विभाग सतत संशोधन कार्यात व्यस्त असतो. येथील small Animal lab ही अतिशय कार्यरत असून विविध संशोधनासाठी येथील लहान प्राण्यांचा उपयोग केल्या जातो. याशिवाय फार्माकोलॉजी विभागाचे वनौषधी उद्यान आहे. आणि बाहेरील फंडिंग एजन्सी कडून संशोधनाचा व पैशाचा ओघ सतत सुरू असल्याने येथील विभागात संशोधनासाठी फारसी आर्थिक चणचण भासत नाही. याचे सर्व श्रेय विभाग प्रमुख फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी यांना जाते. या विभागाकडून प्लेसमेंट सेल चालवल्या जात असून विद्यार्थ्यांना नोकरी विषयक मार्गदर्शन केल्या जाते.

६) विकृतीशास्त्र विभाग (Veterinary Pathology)

मेलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करून रोगाचे निदान करणे व रोगप्रसारास आळा घालणे याबाबत विकृती शास्त्र विभागाची मोलाची भूमिका आहे.या विभाग प्रमुखांच्या आणि संस्थेच्या मालमत्ता अधिकारी व नोडल अधिकारी आणि सहयोगी अधिष्ठाता यांच्या संयुक्त प्रयत्नाने या विभागाने एक भव्य पोस्टमोर्टम हॉल उभारण्याचे मोलाचे कार्य पार पाडले आहे. प्राणीजन्य Zoonotic Diseases ला त्यामुळे आळा बसण्यास निश्चित मदत होईल.

७) पशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग (LPM)

विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग करतो आहे. पंढरपुरी म्हैस प्रक्षेत्र (बफेलो फार्म) या विभागा अंतर्गत असून संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग आपल्या प्रक्षेत्रामार्फत करत असतो. चारा पिके, वैरण उत्पादन इत्यादीमध्ये या विभागाची मक्तेदारी आहे. या विभागाने विकसित केलेले प्रक्षेत्र हे शेतकरी पशुपालक इत्यादींनी येऊन भेट देण्यासारखे व शिकण्यासारखे येथे बरेच काही आहे.

८) कुक्कुटपालन विभाग(Poultry Dept)

या विभागामार्फत राज्य तसेच देशपातळीवरचे अनेकानेक उपक्रम राबवून हा विभाग चिकन, अंडी उत्पादन व त्यांचा प्रचार प्रसार करण्याचे प्रशिक्षण देण्यास तत्पर असतो. पोल्ट्री विभागामार्फत दत्तक ग्राम योजना राबविल्या जात असून मोरगाव भाकरे हे गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यामध्ये या विभागातील शास्त्रज्ञ व वचनबद्ध आणि समर्पित आहेत.

९) पशुवंश व पशुपैदास शास्त्र विभाग (Animal Genetics and Breeding)

पशुवंश सुधारणेच्या दृष्टीने संशोधन व सल्ला या विभागामार्फत देण्यात येतो. या विभागाने विदर्भातील शेळीला बेरारी शेळी असे नामकरण मिळवून देण्यास व पश्चिम विदर्भाचा नावलौकिक वाढवण्यास मोलाचे योगदान दिले आहे. येथील शास्त्रज्ञ संख्याशास्त्र, Statistics, Record Keeping आणि लॅब Development मध्ये अग्रेसर आहेत.

१०) ग्रंथालय :-

येथील ग्रंथालय सुसज्ज असून शास्त्र विषयक टेक्निकल, प्रोफेशनल पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक सुसज्ज ग्रंथसंपदा व इंटरनेट सेवेने सुसज्ज असा हा विभाग आहे.

११) पशूप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग (ARGO Animal Reproduction Gynaecology & Obstetrics)

Embryo Transfer, Stem Cells Technology Develop करण्याचे अहर्निश प्रयत्न हा विभाग करत आहे. जर येथील शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले तर पशू विज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होण्यास मदत होईल.गर्भ निदान करणे, सोनोग्राफी करणे आणि प्रजनन विषयक सल्ला देणे हे या विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे.या विभागातील शास्त्रज्ञ उच्च विद्या विभूषित असून ते त्यांच्या कार्यात नावलौकिक प्राप्त झालेले आहेत आणि विदर्भात नामांकित आहेत.

१२) भिषक शास्त्र / औषधी शास्त्र

सर्व प्रकारच्या पशू पक्ष्यांवर औषधोपचार करण्याचे कार्य याविभागा मार्फत चालते. यासोबतच टिचिंग व्हेटर्नरी क्लिनिकल कॉम्प्लेक्स (TVCC ) हा विभाग खऱ्या अर्थाने PGIVAS चे मुखपृष्ठ आहे. हा विभाग येथील कर्मचाऱ्यांच्या सौजन्यपूर्ण वर्तणुकीने आणि सुसज्ज रोगनिदान यंत्रांनी परिपूर्ण असून येथील विभाग प्रमुख हे घोड्याचे व त्यांच्या आजाराचे विशेष जाणकार आहेत.

१३) शल्यचिकित्सा व क्ष-किरण शास्त्र विभाग

हा विभाग TVCC सोबत हातात हात घालून प्राणांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. शासनाने नवीन स्नातक पूर्व (अंडर ग्रॅज्युएट ) कॉलेज BVSc & A.H. उघडण्याचे ठरवून Nodal Officer / Project Incharge पदाची समर्थ बहुमोल जबाबदारी या विभागाच्या प्रमुखाकडे सोपविली आहे. सोबतच ॲनिमल बर्थ कंट्रोल ( ABC ) हा भटक्या व रस्त्यावरील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट अकोला महानगरपालिकेने या विभागास सोपवला आहे.

१४)पूर्णाथडी म्हैस प्रक्षेत्र

LPM विभागाअंतर्गत उत्कृष्ट असे प्रशिक्षण देणारा हा फार्म आहे.

१५) पोल्ट्री फार्म

कुक्कुटपालन विभागाकडे याची जबाबदारी असून हे एक महत्त्वपूर्ण प्रक्षेत्र आहे.

१६)शेळी मेंढी प्रक्षेत्र

शेळी मेंढी प्रक्षेत्र ४५० एकरवर असून येथील डेप्युटी डायरेक्टर यांनी या विभागास संशोधना सोबतच प्रेक्षणीय स्थळ बनवून PGIVAS चा नावलौकिक वाढविण्यास मोलाचे योगदान दिले आहे. अशाप्रकारे पशुधना विकासामध्ये व अर्थव्यवस्थेमध्ये तसेच शिक्षण संशोधन व विस्तार कार्यामध्ये PGIVAS संस्थेचा मोलाचा व सिंहाचा वाटा आहे.

लेखन-संकलनः- प्रा. डॉ. प्रशांत कुमार कपले

विभाग प्रमुख जीवरसायनशास्त्र विभाग

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला (माफसू अंतर्गत )

Tags: world animal day
Previous Post

Arvind Trivedi : रामायण मालिकेतील ‘रावण’ अरविंद त्रिवेदी यांचे निधन

Next Post

ब्रेकिंग- अकोला जिल्हा परिषद पोट निवडणुकीतील विजयी उमेदवार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Vote Counting

ब्रेकिंग- अकोला जिल्हा परिषद पोट निवडणुकीतील विजयी उमेदवार

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार

निवृत्तीनंतर पैशांची चिंता उरणार नाही, मोदी सरकार लाँच करणार खास पेन्शन योजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.