आर्यन खानची ड्रग्स प्रकरणात चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान आर्यन खानला रडू कोसळले. या दरम्यान आर्यनने जवळपास ४ वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करत असल्याचे सांगितले. आर्यन सोबत इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. शाहरुखच्या मुलाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत घालवली.
आर्यन खानच्या चौकशीदरम्यान समोर आले की आर्यनने फक्त भारतातच नाही भारताबाहेर युके, दुबई आणि इतर देशातही ड्रग्सचे सेवन केले आहे. आर्यनसोबत अटक झालेल्या अरबाज मर्चंटला तो जवळपास १५ वर्षांपासून ओळखतो आणि ते दोघे जुने मित्र आहेत.
आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी या प्रकरणाबद्दल सांगितले की, आम्ही या प्रकरणी एकूण ८ लोकांना अटक केली आहे. हे सर्व क्रुझवर ड्रग्स सेवन आणि सप्लायसाठी आले होते. अटक केलेल्या ८ लोकांपैकी ३ आरोपींना कोर्टात सादर केले आहे. इतर ५ जणांना नंतर कोर्टात सादर करण्यात येणार आहे. एनसीबीची कारवाई अद्याप सुरू आहे. काही ठिकाणांवर झडती होते आहे.