• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

कोल्हापूर पुन्हा हादरले, अंगावर हळद कुंकू टाकून मुलाचा खून, नेमकं काय आहे प्रकरण?

Our Media by Our Media
October 5, 2021
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
118 1
0
murder
27
SHARES
850
VIEWS
FBWhatsappTelegram

कोल्हापूर: शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राजेश केसरकर या पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीला आली. धक्कादायक म्हणजे निष्पाप बालकाच्या मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल आढळून आला आहे. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास सुरू केला आहे.

सोनाळी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील वरद पाटील या बालकाच्या हत्या प्रकरणाला दीड महिना होऊनही त्याच्या हत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. ही घटना ताजी असतानाच शाहुवाडी तालुक्यात आणखी एका बालकाच्या हत्येने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या अमानुष आणि क्रूर घटनेमुळे शाहुवाडी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी मारेकर्‍यांचा तातडीने छडा लावून त्याला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजता आरव मित्रांसमवेत अंगणात खेळत होता. साडेसहा वाजता तो अचानक बेपत्ता झाला. नातेवाईकांनी शोध घेतला पण रात्री उशिरापर्यंत आरव सापडला नाही. नातेवाईकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आरव मृतदेह आढळून आल्यानंतर घरच्यांनी आक्रोश केला.

मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल टाकल्याने हा नरबळीचा प्रकार असावा अशी नातेवाईकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शंका आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहेत. निष्पाप आरवचे कोणी आणि कशासाठी अपहरण केले हा तपासाचा मूळ मुद्दा आहे. खुनानंतर मृतदेहावर हळद कुंकू टाकल्याने या प्रकरणामागे कोणाचा हात आहे. याचाही पोलीस शोध घेत आहेत.

वरद पाटील खुनाचे गुढ कायम….

सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाच्या हत्या प्रकरणाला दीड महिना उलटला आहे. सात वर्षीय वरद रवींद्र पाटील याची अमानुष हत्या नरबळी की अन्य कोणत्या कारणातून झाली, यावर वेगवेगळे प्रवाह असले तरी तपास यंत्रणेने नरबळीचा स्पष्ट इन्कार केला आहे. त्यामुळे खुनामागे दडलेल्या कारणाचे गूढ वाढले आहे.

Tags: CrimeKolhapurMurder
Previous Post

शिवसेना म्हणते, “जय जवान, जय किसानचे नारे कशासाठी द्यायचे?”

Next Post

priyanka gandhi : ‘गुन्‍हा दाखल नसतानाही मी २८ तासांनंतरही पोलिसांच्या ताब्यातच’

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
priynka-ghandhi

priyanka gandhi : 'गुन्‍हा दाखल नसतानाही मी २८ तासांनंतरही पोलिसांच्या ताब्यातच'

aryan khan

४ वर्षांपासून आर्यन खान घेतोय ड्रग्स, NCBच्या चौकशीत केला खुलासा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.