धुळे- पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे 18 व 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या अधिवेशनाचे नियोजनाचा आढावा घेण्यासाठी परीषद कार्यकारणी व अधिवेशन नियोजन समिती यांची संयुक्त ऑनलाईन बैठक होऊन त्यात विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप झाला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यात उरुळी कांचन येथे 18 व 19 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मराठी पत्रकार परीषदेची कार्यकारणी व राष्ट्रीय अधिवेशनाची नियोजन समिती यांची संयुक्त ऑनलाईन बैठक परीषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी सोशल मीडिया सेलचे राज्य निमंत्रक बापूसाहेब गोरे, राज्य प्रसिध्दी प्रमूख अनिल महाजन , परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, सुरेश नाईकवाडे, शिवराज काटकर, कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे, रोहीदास हाके, विभागीय सचिव मन्सूर भाई, प्रकाश कांबळे, महिला आघाडी प्रमूख जान्हवी पाटील आदीनी उपस्थित राहून महत्वाच्या सुचनाही केल्या. तसेच या पुर्वीच्या अधिवेशनाच्या नियोजनाची माहिती सांगत नियोजन करताना घ्यायची दक्षता, काळजी याबाबतही मार्गदर्शन केले.
सुरूवातीला अधिवेशन नियोजनाबाबतचा आढावा पुणे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, सोशल मिडीया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, हवेली तालुकाध्यक्ष बापुसाहेब काळभोर यांनी सांगितला. यावेळी परिषद प्रतिनिधी एम.जी शेलार, तुळशीराम घुसाळकर, शहाजी नगरे, जगदीश राठोड हेही उपस्थित होते.
तर परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनीही मार्गदर्शन करीत सर्वांनी हे अधिवेशन अभूतपूर्व होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन करत अधिवेशन भव्य दिव्यच होणार, असा विश्वासही व्यक्त केला. या बेठकीचे सुत्र संचालन कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी तर आभार सरचिटणीस संजीव जोशी यांनी मानले.