अकोला: दि.4 जागतिक प्राणी दिनानिमित्त स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे जीव रसायनशास्त्र विभागामार्फत सोमवार दि. 4 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा विषय “टॅक्सीडर्मी, मृत्यूनंतरचे जग” हा असून त्या निमित्य देश पातळीवरील नामांकित टॅक्सीडर्मी तज्ज्ञ प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे संचालक(विस्तार शिक्षण) डॉ. अनिल भिकाने यांचे हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे ऑनलाईन https://zoom.us/j/98440788704?pwd=WVZETVNIVy9 TREN ialpxUUFqVE4rQT09 या लिंकवरुन पाहू शकता. जिल्ह्यातील सर्व पशुप्रेमी नागरिक, शेतकरी, पशुपालक, विद्यार्थीनी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत कपले व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चैतन्य पावसे यांनी केले आहे.