अकोला: दि.4 राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सुताचा माळ व पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.