तेल्हारा : शुभम सोनटक्के: तेल्हारा शहरातील श्री छत्रपती प्रतिष्ठान द्वारा विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धांचे आयोजन छत्रपती प्रतिष्ठान द्वारा केले होते. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस स्टेशन तेल्हारा येथे आज संपन्न झाले .
छत्रपती प्रतिष्ठान द्वारे आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत त्यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मरणोत्तर नेत्रदान संकल्प अश्या अनेक सामाजिक कार्यक्रम प्रतिष्ठान ने राबविले आहेत.
यावर्षी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने या स्पर्धेत नागरिकांनी सहभाग नोंदवला होता .या स्पर्धेत प्रथम बक्षीस मंगलमूर्ती अर्बन बँक कडून सौ लताताई चेतन चौधरी यांना देण्यात आले आहे.द्वितीय बक्षीस छत्रपती प्रतिष्ठान द्वारा श्री संदीप बाबूलालजी बायड यांना देण्यात आला आहे तृतीय बक्षीस श्री. अरविंद तिव्हाने यांच्या कडून कु तृप्ती सुधाकर तायडे हिला देण्यात आले आहे. प्रोत्साहनपर बक्षीस कु पूनम अरुण इंगळे हिला किशोर डांबरे यांच्या कडून देण्यात आले .सर्व विजेत्या स्पर्धकांना चांदीची गणेश मूर्ती भेट देण्यात आली आहे. सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गायकवाड यांनी केले त्या नंतर Adv चेतन चौधरी यांनी आपले मनोगत स्पर्धकांच्या वतीने मनोगत व्यक्त केलं. कायंदे साहेब यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण ठाणेदार मा. फड साहेब यांनी केले व पुढील येणाऱ्या काळात छत्रपती प्रतिष्ठान द्वारा आयोजित विविध सामाजिक उपक्रम मध्ये पोलीस स्टेशनचे सहकार्य राहणार असे प्रतिपादन केले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ठाणेदार मा.ज्ञानोबा फड साहेब, प्रमुख उपस्थितीत पो.उ.नि. कायंदे साहेब, सौ. आरतीताई गायकवाड न. प. सदस्य, मनीष गुप्ता साहेब, पप्पूसेठ सोनटक्के, गजानन गायकवाड, किशोर डांबर, वैभव नांदोकर, प्रमुख उपस्थितीत म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विजेते स्पर्धक उपस्थित होते व कार्यक्रमाचे प्रस्तावित गजानन गायकवाड, संचालन प्रा. सचिन थाटे यांनी केले.