अकोला : सद्या महाराष्ट्रमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महिलांविरूध्द होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने मा. जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या संकल्पनेतुन तसेच मा. मोनिका नं. राऊत, अपर पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनात नविन सुसज्ज ‘दामीनी पथक’ सुरू करण्यात आले आहे.
सदर पथकास गस्तीकरीता एक स्वतंत्र नविन स्वरूपात वाहन उपलब्ध करण्यात आले असुन १ महिला पोलीस अधिकारी आणि ०६ महिला पोलीस अंमलदार व ०२ पुरुष पोलीस अंमलदार असे एकुण ०८ अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने अकोला शहरातील विविध निर्जन स्थळी, महाविविद्यालय, विद्यालय, शाळा, खाजगी शिकवणी वर्ग, महिला आश्रम, इत्यादी ठिकाणी प्रभावीपणे गस्त करणार आहेत. त्याचप्रमाणे सदर पथकाव्दारे गस्ती दरम्यान मिळुन आलेल्या व्यक्तीवर मोठया प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. दामीनी पथकामुळे महिलांविरूध्द होणाऱ्या घटनांना आळा बसेल तसेच रोडरोमीओ विरुध्द देखील कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन मुलींची फसवणुक करणे, मुलींची छेडछाड करणाऱ्यां विरुध्द देखील कारवाई करण्यात येईल.
तसेच विविध महाविविद्यालय, विद्यालय, शाळा, खाजगी शिकवणी वर्ग, महिला आश्रम, इत्यादी ठिकाणी महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ऑनलाईन व ऑफलाईन कार्यक्रम आयोजित करून कायदा व सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येईल. महिलांसाठी दामीनी पथकास एक हेल्पलाईन कमांक ७४४७४१००१५ हा देण्यात आलेला आहे. सदर क्रमांकावर पिडीत महिलांनी किंवा संकटात सापडलेल्या महिलांनी तक्रार केल्यास त्वरीत दामीनी पथकव्दारे घटनास्थळी जावुन मदत करण्यात येईल. त्याचप्रमाणे तकारदार यांचे नाव गुपीत ठेवण्यात येईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महिला सुरक्षा दृष्टीने अकोला शहरामध्ये नव्याने सुसज्ज दामीनी पथकाव्दारे प्रभावीपणे गस्त घालण्यात येवुन महिलांविरूध्द होणाऱ्या टवाळखोर/छेडखाणीचे गुन्हे करण्याऱ्या व्यक्तीला आळा बसेल तसेच प्रेमाच्या आमीषाला बळी पडुन प्रियकारासोबत पळुन जाण्याच्या घटनांना देखील प्रतिबंध होईल. तसेच रोडरोमीयो यांच्या विरुध्द प्रभावी कारवाईमुळे असुरक्षीत असलेल्या मुलींना सुरक्षीत असल्याचा दिलासा मिळेल.