मुंबई: महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) एक मोठी कारवाई करत संशयित दहशतवाद्याला अटक (suspected terrorist arrest) केली आहे. या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे (Bandra Mumbai) परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख असे असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली.
त्यानंतर आता वांद्रे परिसरातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी जोगेश्वरीतून एकाला अटक दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली. 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव झाकीर असल्याची माहिती समोर आली होती.
महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली. या झाकीरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकीरला अटक केली होती. अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याने झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते अशी माहिती एटीएसने दिली होती.
ATS चा मोठा खुलासा; Mumbai मध्ये राहणारा जान मोहम्मद 20 वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा असल्याची माहिती समोर आली. ज्याचे नाव जान मोहम्मद असून त्याच्याबाबत एटीएसने मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत जान महोम्मद याच्या बाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असून त्याचे नाव जान मोहम्मद शेख आहे. मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे. जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.