• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

पुणे क्राईम : खूनाची बातमी देणारेच निघाले खूनी

Our Media by Our Media
September 30, 2021
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
161 2
0
बहिणीच्या 'कांदे पोहे' कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : कानून के हाथ लंबे होते है, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र हे वाक्य शिवाजीनगर पोलिसांनी प्रत्यक्षात खरे करून दाखविले आहे. खून झालेल्या व्यक्तीचा कोणताही पुरावा हाती नसताना पोलिसांनी खूनाचा छडा (पुणे क्राईम) लावत दोघांना अटक केली आहे.

महेश शिवाजी देव उर्फ तंबी (वय-३०, रा. खुडे ब्रिजजवळ, शिवाजीनगर) आणि आकाश प्रकाश यादव (वय-३३, वर्ष रा. शनिवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. दोघे आरोपी भंगार गोळा करण्याचे काम करतात. दोघांनाही दारुचे व्यसन आहे. रात्री अपरात्री दारू पिण्यासाठी त्यांनी अनेकांना लुटले असल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्यावेळी दोघांनी ४० वर्षीय व्यक्तीला दारुच्या बाटलीसाठी कात्री आणि दगडाने मारून खून केला होता. त्यानंतर खूनाची माहितीदेखील आरोपींनी पोलिसांना दिली होती.

खून झालेलेल्या व्यक्तीची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. मात्र खून करणारा व्यक्ती काही तरी पुरावा मागे ठेवतोच. त्याने कितीही गुन्ह्यातून वाचण्याचा बनाव केला तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही. कात्री आणि दगड याने मारले.

शिवाजीनगर परिसरातील खुडे ब्रिजखाली नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. सुरुवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अहवालावरून संबंधीत व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले. त्यानुसार शिवाजीगनर पोलीस ठाण्यात अर्जुन नाईकवाडे (वय-२८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर आरोपींचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी तब्बल २५५ सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले, एवढेच नाही तर परिसरातील परिसरातील कचरावेचक, भंगारवाले, भिख मागणारे अशा ७० ते ७५ व्यक्तींकडे चौकशी केली. तरीदेखील पोलिसांच्या हाती खून्याचे धागेदोरे लागत नव्हते.

गुन्ह्याचा तपास अधिकच किचकट होत चालला होता. उपनिरीक्षक क्षीरसागर यांना हा खून दोन गर्दुल्यांनी केला असल्याची माहिती मिळाली. दोघांनी अज्ञात व्यक्तीचा खून करत असाताना एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला होता. त्याने याची माहिती क्षीरसागर यांना दिली. त्यानुसार त्यांनी महेश देव उर्फ तंबी व त्याचा साथीदार आकाश यादव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासत दोघांनी खूनची कबूली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, अर्जुन नाईकवाडे, कर्मचारी अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशिर सय्यद, रुपेश वाघमारे यांच्या पथकाने केली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (पुणे क्राईम) म्हणाल्या की, “अज्ञात व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. बातमीदार, तांत्रिकविश्लेषण व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे पोलिसांनी तपास करून काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यावेळी दररोज परिसरात फिरणार्‍या कचरा वेचणार्‍या काही व्यक्ती दिसून येत नाहीत हे समोर आले. त्यानुसार तपास करत असाताना एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.”

Tags: CrimePune
Previous Post

मोफत शिवभोजन होणार बंद; १ ऑक्टोबरपासून पुन्हा थाळीला १० रुपये

Next Post

किलारी भूकंप : २८ वर्षानंतरही ‘ती’च भीती अन् भोग कायम!!!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
किलारी भूकंप : २८ वर्षानंतरही ‘ती’च भीती अन् भोग कायम!!!

किलारी भूकंप : २८ वर्षानंतरही 'ती'च भीती अन् भोग कायम!!!

मुंबईत 4 ऑक्टोबरपासून शाळेत अशी असेल नियमावली, किशोरी पेडणेकरांनी दिली माहिती

मुंबईत 4 ऑक्टोबरपासून शाळेत अशी असेल नियमावली, किशोरी पेडणेकरांनी दिली माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.