अकोट (देवानंद खिरकर): युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल भाऊ कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मनीष कराळे मित्रपरिवाराच्या वतीने अकोट शहरातील प्रभाग क्र. ०७ मधील पाचपोर प्लॉट मध्ये आज दिनांक २७/सप्टेंबर/२०२१ रोजी सायं ४:०० ते ६:०० वाजेपर्यंत भव्य मोफत बालरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये शहरातील गुरुवंदन बाल रुग्णालयाचे नामांकित डॉक्टर बालरोग तज्ञ डॉ. धर्मपाल सत्यपाल चिंचोळकर यांनी एकूण ७७ बालकांची मोफत तपासणी केली. सदर शिबिरात मित्रपरिवाराच्या वतीने बालकांना बिस्कीट वाटप करण्यात आले.
सद्यस्थितीत डेंगू व निमोमिया ची साथ सुरू असून अशा परिस्थितीत लहान बालकांची योग्य अशी काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रभाग क्र. ७ मधील नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सदर शिबिरास उत्तम असा प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. ऋषिकेश हलकारे, संजय रेळे, राहुल भाऊ कराळे यांची लाभली होती. यासह प्रामुख्याने नगरसेवक तथा शिवसेना गट नेते मनीष कराळे व युवासेना पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने अजय लेलेकर, अक्षय घायल, विशाल कुलट, रितेश उजिडे, विशाल चौधरी यांची उपस्थिती होती. सदर शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभाग क्रमांक- ७ मधील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेना – युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक युवासैनिक सहभागी झाले होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनीष रामभाऊ कराळे मित्रपरिवारातील सदस्य सागर कराळे, करण कहार, विशाल कोडापे, तेजा पालेकर, पंकज पालेकर, विजय पळघन, ईश्वर कहार, सागर लोंढे, सागर तळोकर, अनिकेत पाचपोहे, सुधाकर हिरूळकर, शुभम परियाल यांनी अथक परिश्रम घेतले. मनीष कराळे मित्रपरिवाराच्या वतीने शिबिरात आपली निशुल्क सेवा देणारे कर्तव्यदक्ष डॉक्टर धर्मपाल सत्यपाल चिंचोळकर यांचे आभार मानण्यात आले.