संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रहीवासी थोर कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांनी काल नंदुरबार येथे जामदे गावांमधील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये किर्तन सुरु असतानाच देह ठेऊन जगाचा निरोप घेतला.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कर्तनाची ह.भ.प तजोद्दिन महाराज शेख हे मुस्लीम असताना कट्टर हिंदू प्रेमी होते त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये कीर्तने केली होती शिवसेनेचे प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा अनेक कार्यक्रमात ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांनी आपले किर्तन केले असल्याचे त्यांच्या अनुयायांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ह.भ.प. शेटे महाराज म्हणाले की, ह.भ.प. ताजोद्दीन महाराज यांचा जन्म जरी मुस्लीम समाजात झाला असला तरी त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार केला ह.भ.प. ताजोद्दीन महाराज नेहमीच किर्तनात सांगत असे विश्वात हिंदू धर्मा सारखा श्रेष्ठ कोणता धर्म नाही, वारकरी सांप्रदायासारखा सांप्रदाय नाही, गिता, भागवता, गाथा, ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही एवढेच नव्हे तर हिंदु धर्मा ज्यांचा जन्मा झाला त्यांनी प्रत्येकांनी माळ घालायला पाहीजे असे आव्हान महाराज कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी करत होते.
ह.भ.प. ताजोद्दीन महाराज यांच्या अचाणक जान्याने मोठी पोकळी निर्माण झाली मी विदर्भामध्ये महाराजांचे बरेच कीर्तनाचे कार्यक्रम घेतले आहेत महाराजांचा संभाजीनगर येथे फार मोठा आश्रम असून मनमिळावू स्वभाव, कट्टर हिंदुत्ववादी विचार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र व खडा पहाडी आवाज हे महाराजांचे वैशिष्ट होते.
असं म्हणतात शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी भजन करत असताना मरण येणे हे फार मोठ्या साधूत्वाचे लक्षण आहे नांदुरबार जवळील जांबे गावातील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कीर्तनातील विषय भजनाचा चालू होता आणि तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावेते हे प्रमाण चालू असताना अचानक महाराजांना चक्कर आल्यासारखे झाले आणि चारू कीर्तनात खाली बसल्या नंतर हृदयविकाराच्या झटक्याने महाराजांना देवाज्ञा झाली खऱ्या अर्थाने म्हणावे लागेल याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा.
अशा या महान संत विभूतीला सर्व वारकरी सांप्रदायाच्या सर्व साधक मंडळींच्या वतीने व विश्व वारकरी सेनेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजी मी अर्पण करतो असे सांगत हभप गणेश महाराज शेटे यांनी त्यांच्या जुन्या आठवनींना उजाळा दिला.