तेल्हारा : आपली संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जुडलेली नसुन संघटनेत सर्व जाती धर्माचे लोक आहेत. असंघटित मजुर संघटना ही खऱ्या कामगार मजुराच्या पाठिशी सदैव उभी राहणार संघटनेचा घ्यास हा शासनाने कामगारा साठी सुरू केलेल्या योजना ह्या मजुर कामगार पर्यंत पोहचविण्यासाठी अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. असे असंघटित मजुर संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी दि 26 सप्टेंबर रोजी तेल्हारा येथिल भागवत मंगल कार्यालयात आयोजित मंजुर संघाच्या मेळाव्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
या वेळी मंचावर लक्ष्मिकांत कौठकार, अध्यक्ष अकोला जिल्हा शेतकरी संघटना, तर सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सोनटक्के, मजुर संघ चे उपाध्यक्ष अब्दुल बशिर तालुकाध्यक्ष गोपाल खोपाले, महा सचिव विनोद जपसरे, सचिव मनोज बाविस्कार, केद्रिंय सदस्य अब्दुल जमिर, दिपक राऊत, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नितीन वाकोडे, उपाध्यक्ष गणेश मोरे, रघुनाथ भिलकर, राजेश मेहसरे, प्रकाश मोरे, रमेश बावणे, सत्यशिल तायडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी मंचावरील उपस्थिताचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. ते पुढे म्हणाले आपन संघटनेत जुळुन व इतराचाही संघटनेत समावेश करावा असे आवाहन यावेळी केलेया वेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल खोपाले, उपाध्यक्ष जफर पठाण, सचिव वसंता युतकार,सहसचिव गणेश जळमकार, सदस्य रामेश धारपवार, संतोष देउळकार, रामा श्रीवास, संतोष ठाकरे, प्रितम वानखडे, शेख अखबर, यांना यावेळी कार्यकर्ता गोरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक लक्ष्मिकांत कौठकार, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सोनटक्के तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगि बिल्डींग पेंटर,बांधकाम मजुर, हमाल, घरकाम करणारे, शेत मजुर सुतार, लोहार या वेळी उपस्थितीत होती. कार्यक्रमाचे आयोजन तेल्हारा तालुका सर्व असंघटित मजुर संघ तेल्हारा च्या वतिने करण्यात आले होते सुत्रसंचालन गिरि सर यांनी केले तर आभार रोहित खोपाले यांनी मानले.