अकोला : रामदास पेठ कोर्टसमोरील गेट जवळ एक इसम कार चालवत असताना त्याला रोड वरील बाजूला खड्डा दिसला नाही. व त्याने सरळ गाडी आणून खड्ड्यामध्ये टाकली परंतु आपल्या कार्यावर तत्पर ट्राफिक पोलीस कृष्ण चंद्र पवार, श्री. गजानन घोंगडे, संजय इंगळे, सुरेंद्रकुमार दुबे या ट्रॅफिक पोलीसांनी त्या व्यक्तीची गाडी काढण्यास मदत केली. व त्याचे प्राण वाचवले काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
अशी अवस्था त्या कार चालकाची झाली होती त्याच्या मदतीला नागरिक व पोलीस धावून आले होते अश्या कर्तव्यदक्ष ट्राॅफिक पोलीसांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी जाऊन सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी अमोल जामणिक, भुषण खंडारे उपस्थित होते.