दहीहंडा (कुशल भगत): दि.२५/०९/२१ सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान रोजी गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून टाकळी बुद्रुक फाटा येथे एक इसम मोहन दादाराव बगे वय 22 वर्ष राहणार नखेगाव तालुका अकोट जिल्हा अकोला पोलीस ठाणे दहीहंडा हा एका पोतडी मधे तलवार घेऊन जाताना मिळून आला. त्याचे जवळील लोखंडी धारदार तलवार जप्त करून आरोपीचे सदरचे कृत्य कलम 425 Arm act प्रमाणे होत असल्याने त्याच्यावर सदरचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.
सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब, अप्पर पोलीस उपधीक्षक मोनिका राऊत मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर मॅडम, ठाणेदार सुरेंद्र राऊत यांचे मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे पोलीस हवालदार यादव पोलीस अंमलदार शेखर कोदरे यांनी केली.