तेल्हारा: शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जिजाऊ ऊद्यान अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून या उद्यानाच्या सौंदर्यीकरनाकड़े तेल्हारा नगर परिषद चे दुर्लक्ष होत असून जे विकास कामे झाले. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे जिजाऊची लेक म्हणून घेणाऱ्यांनी तेल्हारा नगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या जिजाऊ अहिल्याबाई उद्याना कड़े लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तेल्हारा शहरातील जिजाऊ अहिल्याबाई उद्यान हे एकमेव उद्यान नागरिकांना, मुलांना फिरण्या बसन्या करिता प्रशस्त आहे. परंतु या उद्यानाला अतिक्रमणाचा विळखा बसल्यामुळे हे उद्यान तेल्हारा शहरांमध्ये कुठे आहे.
हे समजन्याच्या पलीकडे गेले आहे. कारण या उद्यानाच्या तिन्ही बाजूला अनेक व्यवसायिकांनी आपले व्यवसाय थाटून या उद्यानाला दिसेनासे करून सोडले आहे. त्यामुळे सदर उद्यान अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असल्यामुळे तसेच सदर उद्याना मध्ये सर्वत्र घानीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. उद्यानाच्या बाहेर जी परिस्थिती आहे. त्याच प्रमाणे आत सुद्धा तीच परिस्थिति आहे. कारण आत मध्ये गवत व झाडाझुडपांनी सदर उद्यान व्यपल्याचे दिसून येत असून तेल्हारा नगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता या जिजाऊ उद्यानाच्या सौंदर्यीकरनाकडे व उद्यान अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
ते अतिक्रमण काढून या उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांनी सदर जिजाऊ उद्यानाकडे लक्ष देण्याची गरज असून त्यांना सुद्धा केवळ जिजाऊ जयंती पुरताच या उद्यानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सदर उद्यान अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. ते अतिक्रमण काढन्या करिता नगरपरिषद ने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे. तेल्हारा नगर परिषदेच्या अध्यक्ष, मुख्याधिकारी या महत्वपूर्ण विषयाबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.