अकोलाः राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्णांना मोफत औषधोपचाराबरोबर पौष्टीक आहार मिळावा यासाठी केंद्र शासनाच्यावतीने क्षयरुग्णांचे उपचार सुरु असेपर्यंत दरमाह ५०० रुपये पोषण आहार भत्ता दिला जातो. क्षय रुग्णांना पोषण आहार भत्ता मिळावा यासाठी अशा रुग्णांनी बँक खाते अद्यावत करणाऱ्या सुचना मनपा प्रशासनाने केल्या आहेत. आहार भत्ता मिळावा यासाठी प्रत्येक क्षय रुग्णाचे बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती क्षयरुग्णांनी वेळेवर उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. परंतु ही माहिती क्षयरुग्ण वेळेवर देत नाहीत. किंवा दिली तरी सदर बँक खाते अद्यावत असेल असे नाही. ते बंद देखील असते. त्यामुळे पोषण आहार भत्ता शासनाकडून अडचणी येत असतात. सदर पोषणआहार भत्ता शासनाकडूनजसे अनुदान उपलब्ध होते तसे ऑनलाईन.
पद्धतीने क्षयरुग्णांच्या बँक खात्यावर अदा करण्यात येते. जानेवारी २०२१ पासुन आजपर्यंत अकोला शहरामध्ये मनपा दवाखाने व खाजगी दवाखाने यामध्ये उपचार घेणार १०४२ क्षयरुग्ण असुन त्यापैकी ६२६ इतक्या क्षयरुग्णांचे बँक खाते अद्यावत आहे. ज्या क्षयरुग्णांनी बँक खात्याची माहिती दिलेली नाही. त्यांना पोषन आहार भत्ताचा लाभ देता येणे शक्य नाही. त्यांचे बँक खाते अद्यावत करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. मनपासह शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांनी वेळेवर आपल्या बँक खात्याची माहिती उपलब्ध करुन दिल्यास पोषण आहार भत्ता सर्व क्षयरुग्णांना अदा करण्यात येईल. व तांत्रिक कारणास्तव खाते बंद असल्यास त्या संदर्भात क्षयरुग्णांना मार्गदर्शन करण्यात येते. रुग्णांनी कार्यालयाशी किंवा जिथे उपचार घेतात तिथे संपर्क साधावा, असे आवाहन मनपाच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी केले आहे.