अकोला : दि.24: डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेअंतर्गत सन 2021-22 करीता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी इयता 10 वी मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी, एनईईटी व जेईई यासारख्या व्यावसायिक उच्च शिक्षणाची पुर्वतयारी करता यावी याकरीता विशेष अर्थसहाय्य देण्यात येत आहे. मार्च 2021 मध्ये 10 वी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लागू असून विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लक्ष 50 हजारपेक्षा कमी असावे, कुटूंबातील सदस्य शासकिय/निमशासकिय सेवेत कार्यरत नसावा याकरीता पालकांनी स्व:घोषणापत्र जोडावे, विद्यार्थी किंवा वडील यांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 10 वीची गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र साक्षांकित करुन अर्ज करावा.
योजनाची अधिक माहिती, अटीशर्ती व अर्जाचा नमुनाबाबतची माहिती बार्टीच्या https://barti.in/notice-board.php संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज डॉ. बाबासाहेब आबेडकर संशेाधण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या पत्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावे, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त पीयुष चव्हाण यांनी केले आहे.