अकोला: दि.21: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शनिवार (दि. 25 सप्टेंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान व एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.