नवी दिल्ली : देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोळ्यासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानेच नेमक काय घडलं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका महिलेच्या हत्येचा तपास पोलीस करत असताना या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईसोबत काय घडलं, याची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं.
तीन वर्षांच्या छोट्या मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हत्येचा सुगावा लावला आहे. तपासादरम्यान, हत्या झालेल्या महिलेच्या मुलाशी पोलीस बोलले तेव्हा त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. आपल्या वडिलांनीच आईला मारल्याचं म्हटलं आहे. जेवण चांगलं का बनवत नाहीस, असं विचारत वडील आपल्या आईला काठीने मारत होते. खूप वेळ वडिलांनी आईला काठीने बेदम मारहाण केल्यामुळे आई खाली पडली. आईला डॉक्टरकडे देखील नेलं नाही अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.
न वर्षांच्या चिमुकल्यामुळे लागला हत्येचा सुगावा
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमध्ये यशोदा आणि विनोद लोहा हे दांपत्य राहत होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत होती. पतीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही यशोदाने आपल्या घरच्यांना दिली होती. सतत जीवे मारण्याची धमकी देणं, मारहाण करणं असे प्रकार होत होते. नीट स्वयंपाक करत नसल्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर पतीने यशोदाला बेदम मारहाण केली. पाईप आणि काठीने बेदम मारहाण करताना यशोदाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.