तेल्हारा : तेल्हारा तालुका विधी सेवा समीती तर्फे मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर ग्रामपंचायत ईसापुर येथे घेण्यात आले यावेळी ईसापुर येथिल गावच्या प्रथम नागरीक मिराताई आनंद बोदडे सरपंच, महादेवराव नागे उपसरपंच तसेच वकील संघाचे अध्यक्ष विलासराव जवंजाळ आर. पी. मंञी अरुण कुकडे, आशुतोष राहाणे, कोर्ट कर्मचारी धुराटे, पञकार आनंद बोदडे, खंडुजी घाटोळ, माजी उपसरपंच ज्ञानदेवराव बोदडे, माजी उपसपंच वासुदेवराव मोरे, वासुदेवराव घाटोळ, रामदास घाटोळ, मनोहर शिंदे, रामदास वारुळकर, शिवराम घोडस्कार महादेवराव वाऊटकार, उदेभान घाटोळ, किशोर घोडस्कार, महादेव मोरे, यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थीत होते.
सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर व माहात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थीत मान्यवरांच्या हस्तै करण्यात आले आणी त्यांणी नंतर प्रमुख अतिथी म्हणुण लाभलेले. विलासराव जवंजाळ यांचे स्वागत मिराताई बोदडे सरपंच यांणी केले. प्रमुख उपस्थिती म्हणुन लाभलेले. आर पी. मंञी यांचे स्वागत उपसरपंच महादेवराव नागे उपसपंच यांणी केले. अरुण कुकडे यांचे स्वागत खंडुजी घाटोळ यांणी केले.
आशुतोष राहाणे यांचे स्वागत किशोर घोडस्कार यांणी केले तसेच उपस्थित ग्रामस्थांचे वतीने प्रमुख अतिथी व उपस्थिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपसरपंच यांचे स्वागत उपस्थित ग्रामस्थांनी केले यावेळी प्रास्थावीक मनोगत व्यक्त करतांना उपस्थीत जेष्ठ नागरीक यांणा मालमत्ता क्ट बद्दल महत्वाची माहीती देवुन शक्यतोवर आपली संपत्ती मुलाचे नावाने करतांना बक्षिस पञ न करता मृत्युपञ करुन ठेवावे जेणेकरुन आपली मुले वृध्द आई वडीलांचा योग्य रित्या सांभाळ करतील तसेच विलासराव जवंजाळ यांणी मोबाईलवर धार्मिक तेढ निर्माण करनारी पोष्ट टाकल्यामुळे काय दुष्परीनाम होतात. तसेच बाल लैगीक प्रकरणे कशी घडतात आपल्या मुलांवार पाल्यांणी कसे लक्ष ठेवावे तसेच मोटार वाहन कायदा महीलां वरील वाढणारे विनय भंग, जेष्ठ नागरीक कायदा यासह विविध विषयावार विस्तृत माहीती दिली.
तसेच अरुण कुकडे यांणी शेतकऱ्यांनी शेतरस्त्या करिता मामलतदार क्ट प्रमाणे कुठे दाद मागावी या संदर्भात सविस्तर माहीती दिली. आशुतोष राहाणे यांणी माहीती अधिकार नियम २००५ या विषयाची सविस्तर माहीती दिली शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मिराताई बोदडे यांणी तालुका सेवा विधी अंतर्गत उपस्थीत सर्व डव्होकेट यांणी ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले असुन हा उपक्रम खुप महत्वाचा असुन यामुळे नागरीकांचा वेळ आणी पैसा वाचेल नागरीकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार पञकार आनंद बोदडे यांणी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघपाल ससाने सोनु मोडोकार यांचे सह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.