कोल्हापूर: हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. भैय्या माने यांनी मुश्रीफ रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बॉम्बे रुग्णालयात हसन मुश्रीफ यांच्यावर मुंबईमध्ये बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना ताप आल्याने उपचार सुरु असल्याची माहिती भेय्या माने यांनी दिली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोमय्यांची ‘ईडी’कडे तक्रार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लाँडरिंग आणि बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात दाखल केली आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लाँडरिंग आणि बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात दाखल केली आहे.
किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. हे सर्व आरोप मुश्रीफ यांनी तत्काळ फेटाळून लावले. मंगळवारी सोमय्या यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली व त्यासंबंधीची कागदपत्रे सुपूर्द केली.
या तक्रारीत त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये सर्वसामान्य शेतकर्यांनी गुंतवणूक केल्याचा दावा केला असला तरी त्याबतचे कोणतेही पुरावे मुश्रीफ यांनी दिलेले नाहीत, असे ते म्हणाले.
या कारखान्यात अबिद हसन मुश्रीफ, नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ आणि साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावे 13 कोटी 30 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. हसन मुश्रीफ यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा मनी लाँडरिंग करून पांढरा केला आहे, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
रजत कंझुमर सर्व्हिसेस लि., माउंट कॅपिटल प्रा. लि., मरुभुमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., नेस्टजेन कन्सल्टन्सी सर्विसेस आणि सरसेनापती शुगर्स या शेल कंपन्यांच्या माध्यमातून 78 कोटी 91 लाख रुपये मुश्रीफ यांनी कारखान्यात आणले. या कंपन्यातील अनेक भागधारक हे बेनामी आहेत. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
मुश्रीफ यांनी घेतली शरद पवारांची भेट
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून यासंदर्भात ‘ईडी’कडे तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पवारांशी चर्चा केली.
मुश्रीफ यांनी मंगळवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. अनिल देशमुख यांच्यानंतर मुश्रीफ यांना भाजपकडून टार्गेट करण्यात आल्याने पवार चिंतेत आहेत.
मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपावर आपली बाजू मांडताना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. त्यामध्ये काहीही वावगे नाही. यापूर्वीही आयकर विभागाची चौकशी लावून आपल्याला भाजपने गोवण्याचा प्रयत्न केला होता. आता ईडी आणि अन्य यंत्रणांकडून त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पवार यांना सांगितल्याचे समजते. दोन्ही नेत्यांमध्ये या आरोपांना कसे प्रत्युत्तर द्यायचे यावरही चर्चा झाली.