अकोला: शहरात अवैध स्वरूपात चांदी आणत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बस स्थानक परिसरात 40 किलो चांदी जप्त केले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एक व्यक्ती अवैध स्वरूपात चांदी आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बस स्थानक परिसरात सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. यावेळी त्या व्यक्तीच्या ताब्यातून 40 किलो चांदी जप्त करण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, शक्ती कांबळे, फिरोज शेख, वीरेंद्र लाड, गोपीलाल मावळे आदींनी केली.