कुडाळ : जावळी तालुक्यातील एका गावात अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार (Tyranny) केला असल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. मुलीवर अत्याचार (Tyranny) करणारा ६५ वर्षाचा वृद्ध असल्याचे समोर आले आहे. मेढा पोलीस स्थानकात बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५) राहणार नेवेकरवाडी तालुका जावळी या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (65 year old arrested for torturing 11 year old girl)
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अत्याचार करणारा संशयित आरोपी बबलिंग उर्फ बबन सपकाळ याने पिढीत मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर खेळत असतानाच तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तिला फसवत अनोळखी ठिकाणी हाताला धरून घेऊन गेला व त्या पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
आत्याचारानंतर मुलीला नाव सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यासंदर्भात पिडीत मुलीने यासंदर्भातली घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मेढा पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकिकत सांगितली.
यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात संशयित आरोपी सपकाळला ताब्यात घेतले. अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सपकाळला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांनी भेट दिली.
अधिक तपास मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.