• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आचरा : चिंदर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, आकस्मिक मृत्युची नोंद

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
107 1
0
चिंदर-
32
SHARES
769
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

आचरा:  चिंदर- नागोचीवाडी येथून बेपत्ता महिलेचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह चिंदर-मुरूमखणी भागात बुधवारी सकाळी आढळून आला. हा मृतदेह चिंदर नागोचीवाडी येथील बेपत्ता कल्पना कृष्णा पडवळ (वय 52) हिचा असल्याचे निष्पन्न झालेे. ही महिला मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत 22 ऑगस्टपासून बेपत्ता झाली होती. याबाबतची फिर्याद तिचे पती कृष्णा पडवळ यांनी आचरा पोलिस ठाण्यात दिली होती.

आचर्‍याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर यांनी दुपारी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली. या घटनेची आचरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मनोरुग्ण असलेल्या कल्पना पडवळ या 22 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6 वा. घरात कोणालाही न सांगता बाहेर गेल्या. त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिची गावात, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, आढळून न आल्याने तिचे पती कृष्णा पडवळ यांनी आचरा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी गावातील काही तरुण मुरूमखणी भागात माळरानावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या युवकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी कारणांचा शोध घेतला असता त्यांना सडलेल्या अवस्थेतेतील मानवी मृतदेह दिसून आला. तरुणांनी लागलीच वाडीत धाव घेत याची माहिती वाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थांना दिली.

अंगावरील दागिने, चप्पल, साडीवरून पटली ओळख

घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांच्या समवेत पोलिस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, महेश देसाई, अनिकेत सावंत, अविताज भाबल, अक्षय धेंडे दाखल झालेत. चिंदर ग्रामपंचायत सदस्या दुर्वा पडवळ, माजी सरपंच संतोष कोदेही हजर होते.

पोलिसांची घटनास्थळी पाहणी

पोलिसांनी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसमवेत पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने, हातातील बांगड्या, पायातील चप्पला, अंगावरील साडी यामुळे तो मृतदेह बेपत्ता कल्पना पडवळ यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर घरातील नातेवाईकांना मृतदेह दाखविला असता मृतदेह बेपत्ता कल्पना पडवळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

कुजलेल्या अवस्थेत मानवी मृतदेह मिळाल्याचे समजल्यानंतर कणकवलीचे डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर घटनास्थळी दाखल झालेे. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल साळुखे यावेळी उपस्थित होते. त्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Tags: death bodyMumbaiWomenआचरा
Previous Post

सततच्या नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने केलि गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

Tyranny : ११ वर्षाच्या मुलीवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचार, वृद्धास अटक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
crime

Tyranny : ११ वर्षाच्या मुलीवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचार, वृद्धास अटक

murder crime

आईनेच प्रियकराच्या मदतीने तोंडात बोळे कोंबून घेतला पोटच्या मुलाचा जीव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.