अकोला – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनेचा अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्टे
मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्व गुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी विशेष /छंद प्रशिक्षणाची सुविध, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती.
प्रमुख घटक आणि पात्रता
वैयक्तिक मधपाळ ५ ते १० मधपेट्या
पात्रता-अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त.
केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ
पात्रता-किमान दहावी वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यतिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्रचालक संस्था
पात्रता- संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १००० चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेल्या सेवा असाव्यात.
केंद्रसंचालक
पात्रता- २५ ते ५० मधपेट्या ४२०० रुपयांप्रमाणे ५० टक्के अनुदानावर घेण्यासाठी ५० टक्के रक्कम जमा करणे आवश्यक.
अटी व शर्ती–
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरू करणे संबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील व मंडळामार्फत प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य.
ड) अधिक माहितीसाठी संपर्क-
१. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, श्रीमती एन. टी. लवाळे महराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अकोला मो.न. 8432989123, 8698057013 द्वारा –जिल्हा उद्योग केंद्र, जुना कॉटन मार्केट, अकोला दुरध्वनी क्र. 0724 -2430250
२. संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५ मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा- ४१२८०६ , दुरध्वनी- 02168-260264. तरी इच्छुकांनी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.