अकोट(देवानंद खिरकर)- सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील बराचसा भाग हा संत्रा फळपिक आणी चांगल्या उत्पादन क्षम मालाच्यासाठी प्रसिध्द आहे.मात्र गेल्या काही वर्षापासुन संत्रा उत्पादक शेतकरी कधी अवकाळ,तर गारपिट,तार कधी व्यापारी यांच्या पिळवणूकीला बळी पडत आहे.एकीकडे शासनामार्फत कोरोना साठी रोग प्रतीकाराक शक्ती वाढावी यासाठी संत्रा या फळावर मोठ्या प्रमाणात सांगितले जात आहे.मात्र त्या मालाची विक्री करण्यासाठी यंत्रणा मात्र सतर्क होतानां दिसत नसल्याचे शेतकरी वर्गा कडुन बोलले जात आहे.
गेल्यावर्षी वातावरणातील बदलामुळे संत्रा या पिकाचा आंबिया बहार होता मात्र या वर्षी पावसामुळे सतत ओलावा असल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतानां दिसत आहे.आणि वरुन व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होतानां दिसत आहे.सुरुवातीला चारशे ते पाचशे रुपये प्रति 20 किलो ची कॅरेटची मागणी होती.मात्र गेल्या काही दिवसांपासून आता दीडशे ते दोनशे रुपयांवर आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी होतानांदिसत आहे.
अकोट तालुक्यात बोर्डी,रामापुर,शिवपूर,राहणापुर,कासोद,उमरा,सुकळी,अकोलखेड,पिंप्री,हा सातपुड्याचा पायथ्याशी भाग संत्रा फळ बागेसाठी चांगला आहे.त्यामुळे येथील बहुतांश शेती ही संत्रा,लिंबू,केळी,मध्ये व्यापले आहेत.या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मागील काही वर्षापासून सातत्याने या ना त्या कारणाने अडचणीत येत आहेत.कधी पाणी कमी झाल्याने तर कधी जास्त झाल्याने कोंडीत सापडला आहे.काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबिया आणि मृग असा दोन्ही प्रकारच्या बहार आहे.त्यापासून मुबलक प्रमाणात पैसे मिळण्याची मोठी अपेक्षा येथील शेतकरी करीत होते. मात्र हवामानातील बदल आणी व्यापारी वर्गाची चाप यात संत्रा उत्पादक शेतकरी चांगला भरडुन निघत आहे.चांगले पिक आणी मुबलक दाम अशी अपेक्षा धरुन बसलेल्या शेतकऱ्यांना अस्मानी सह सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.यावर्षी सुरूवातीला कमी पावसामुळे हुकमी असा संत्रा पिकाचा मृग बहार फुटला नाही त्यामुळे परिसरातील ९९ टक्के बागा खाली आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या बागेत आंबिया बहारा फुटला आहे त्याचे बेहाल होत आहेत.