मुंबई: मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा (Mumbai Rape case) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या निर्भयाची अखेर मृत्यूशी झुंज संपलीय. त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आला होता. (Mumbai Rape case) हा अमानवीय प्रकार समोर आल्यानंतर मुंबई हादरली आहे.
या घटनेवरुन भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना ऐकून नि:शब्द झाले. कायद्याची भीती राहिलेली नाही. सहनशीलतेचा अंत बघू नका. महिलांवर असे अत्याचार होतात, आम्ही गप्प बसायचं, अशा शब्दांत निर्भयाच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शक्ती कायदा आणणार होते, त्याचं काय झालं? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
रक्ताच्या थारोळ्यात पडली होती महिला
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एक ३० वर्षीय महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशी माहिती पोलिस कंट्रोल रुमला मिळाली होती.
साकीनाका येथे खैराना रोडवर महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन पोलिसांना आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी महिलेची स्थिती गंभीर होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती.