तेल्हारा: स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात गृह-अर्थशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक पोषण आणि आहार सप्ताह अंतर्गत कोव्हिड काळातील मानवी जीवनात आहार शास्त्राचे महत्त्व या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले हे होते. राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटक म्हणून डॉ. मनिषा व्यास, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख एसपीटीएम महाविद्यालय सुरत, गुजरात ह्या होत्या, प्रमुख वक्तया म्हणून डॉ. सुजाता सबाने, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती, डॉ. संजीवनीताई बिहाडे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ तेल्हारा उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. उदय देशमुख, महाविद्यालय विकास समिती सदस्य, सुधीर देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय वेबीनारच्या समन्वयक प्रा.सुषमा फरसोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा माहुरे यांनी केले तर आभार प्रा. दिपाली भुईभार यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश देवतळे सचिन ढोले यांनी परिश्रम घेतले या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.