पातुर:– अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ शाखा पातुर च्या वतीने विर तरुणांचा
पातुर येथील सिटी चँनल कार्यालय येथे पातुर तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे सत्कार करण्यात आला. धोधानी धबधब्यात पर्यटकांचे प्राण वाचविणाऱ्या तरुणांचा सत्कार करुन त्यांना शौर्य पुरस्कार मिळावा या करीता पाठ पुरावा करणार आहेत असे सांगितले. दरवर्षी श्रावण महीन्यात धोधानी या पर्यटन स्थळावर पर्यटक फार लांबून येत असतात. व तेथे असलेल्या नदीच्या डोहात पोहोण्याचा आनंद घेतात अशातच एक तरुण पाण्यात बुडतांना गौरव श्रीनाथ च्या मित्रांना दिसले व त्यांनी गौरवला सांगितले असता गौरव ने जिवाची पर्वा न करता डोहात उडी मारली व बुडणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा 17 वर्षीय गौरव सुरेश श्रीनाथ याने जीव वाचवला. तसेच रणजीत जगदीश गाडेकर याने सुद्धा एक महिला बुडतांना लक्षात येतात त्या महिलेचे प्राण वाचवले.
आपत्कालीन परिस्थिती मधे
आज च्या काळात अशा विर तरुणांची गरज आहे.
असे पातुर येथील विर योद्धे गौरव श्रीनाथ यांच्या कौतुकास्पद कामगिरी बदल पातुर तहसीलदार दिपक बाजड व पातुर नगर परिषद नगर अध्यक्ष श्रीमती प्रभाताई कोथळकर यांनी कौतुक करुन 17 वर्षीय गौरव चा सत्कार करण्यात आला.
तसेच तिन पर्यटकांचे धोधानी धबधब्या मध्ये बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणारे अल्पवयीन गौरव सुरेश श्रीनाथ व रणजीत गाडेकर यांचा पत्रकार संघटने तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार पातुर तालुका अध्यक्ष अ.कुध्दुस शेख, जेष्ठ पत्रकार अकोला जिल्हा सदस्य उमेशभाऊ देशमुख, जेष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे, जेष्ठ पत्रकार माजी तालुका अध्यक्ष मोहनभाऊ जोशी, पत्रकार सतिष सरोदे, प्रमोद कढोणे, किरणकुमार निमकंडे, शेगोकार सर, संगीता इंगळे, नातीक शेख सह आदी पत्रकार मंडळी उपस्थीत होती.