कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. दमदार पाऊस आणि संततधारेमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
बुधवारी पहाटे पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई व इचलकरंजी तर वारणा नदीवरील चिंचोली आणि माणगाव असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी सकाळी दहा वाजता अठरा फुटावर गेली होती.