अकोला- गेल्या दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश परिस्थिती असल्याने जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडविला असून गांधीग्राम येथील पुलावरून काल दुपारीच पुराचे पाणी वाहू लागले होते.
तर आज रात्रीच्या वेळी अंदुरा तालुका बाळापूर येथील पूर्णा नदीच्या पुलावरून तीन फूट पुराचे पाणी असून पुराच्या पाण्यामुळे नदीवरील पुलाचे नुकसान होत असून पुलावरील रस्ता चक्क उखडून वाहून गेला आहे तर पुलावरील सिमेंटचे कठडे सुद्धा वाहून जात असल्याने सदर पूल धोकादायक बनला आहे तरी वाहनधारक तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे.