हिवरखेड(धिरज बजाज)- हिवरखेड येथे साध्या पद्धतीने शेतकरी बांधवानी घरच्या घरी पोळा उत्सव साजरा केला. दोन वर्षे अगोदर चौका चौकात बैल पोळा मोठ्या प्रमाणात भरायचा आणि शेतकरी बंधू नारळाची तोरणे बांधून मोठं मोठे पोवाळे म्हणायचे मात्र कोरोना नियमामुळे पोळा उत्सवात घसरण आली. परंतु शेतकरी बांधवांचा आनंद उत्सव मात्र कमी झाला नाही. गावात सर्वांनी वर्षभर शेतात राबणारे आपले बैल छान प्रकारे सजवले सर्वांनी बैलाची पूजा केली,आणि बैल पोळ्याचे औचित्य साधून गावात नगरपंचायत झालीच पाहिजे अशी जनजागृती केली,
अनेक बैलांच्या पाठीवर हिवरखेड नगरपंचायत झालीच पाहिजे अशी घोषणा लिहीलेली होती. आधी या बैलाच्या पाठीवर मराठी हिंदी चित्रपटांची नावे अथवा लोकप्रिय संवाद लिहायचे. परंतु यावर्षी मात्र गावात शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलाच्या पाठीवर, फक्त आणि फक्त नगरपंचायत पाहिजे असे उदगार वाचक शब्द लिहीले यावरून सर्व हजारो ग्रामस्थांसोबतच सोबतच शेतकरी बांधवांना सुद्धा गावात नगरपंचायत पाहिजेच.
आता नागरिकांची संयम संपत आला असून गावात नगरपंचायत हा विषय फारच रंगत आहे. गावकऱ्यांनी काही टोकाचे पाऊल उचलण्याआधी शासनाने वरिष्ठ स्तरावरून त्वरित गावकऱ्यांची मागणी पूर्ण करावी, गावकरी उत्स्फूर्तपणे गावाचा विकास होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्याचे स्वप्न पूर्ण करून गावात नगरपंचायत त्वरित करावी अशी मागणी ४० हजार नागरिक करीत आहेत.