अकोला: अकोला गुन्हे शाखेतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्याच्या नावाने शहरातील नामांकित ट्रान्सपोर्ट व्यवसायीकाकडून १० लाख रुपये वसुल करण्यासाठी दबाव टाकल्या प्रकरणी त्या खंडणीखोर ५ पोलिस कर्मचा-यांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने स्थानिक गुन्हे शाखेतील खाबूगिरी उघड झाले आहे.
अकोल्यातील विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ़ यांचे चक्क अपहरण करून स्थानिक गुन्हे शाखेत आणले तसेच त्यांचे तीन ट्रक ज़बरदस्तीने एलसीबी आवारात गैरकायदेशीर उभे करुन ठेवले आणि गुन्हे दाखल करण्याची ताक़ीद देत, राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्याच्या नावाने १० लाखाची मागणी केली. अशा आशयाची तक्रार विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ़ यांनी करून या तक्रारीची प्रतिलिपि पंतप्रधान,परिवहन मंत्री, पोलिस महासंचालक, अमरावती विभाग पोलिस महानिरीक्षक, अकोला जिल्हा पोलिस यांना ही दिली.
वारंवार या तक्रारीवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. मात्र कारवाई झाली नाही. तेव्हा न्यायालयात याचिका दाखल केली.दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकुन तथ्य व परिस्थितिजन्य पुरावे ग्राह्य धरुन जयंता श्रीराम सोनटक्के,किशोर काशीनाथ सोनावणे,वसिमोद्दिन अलिमोद्दिन,अश्विन हरिप्रसाद मिश्रा व इतर एक यांच्या विरुध्द भादवी कलम.
452,294,504,506,363,365,368,339,341,342,384,385,386387,388,389,350,351,352,357,149,तथा 120(b) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोप असुन, त्यांच्यावर RCC no 1128/21 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याचिककर्त्याकडून अँड.नजीब शेख यांनी युक्तीवाद केला.