अकोला(प्रतिनिधी)- अकोट फाईल पोलिसांनी कारवाई चा सपाटा लावला असून एका पेक्षा एक उत्कृष्ट कारवाई करत पोलीस खात्याची ख्याती अटकेपार नेण्याचा जणू चंग बांधला आहे दोन दिवसात दोन पिस्टलची कारवाई करत आरोपींना अटक केली तर आज एका अट्टल दुचाकी चोरास अटक करण्यात अकोट फाईल पोलिसांना यश आले आहे
शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असून अनेक दुचाकी चोरीचा तपास पोलीस करीत आहेत अशीच एक फिर्याद अकोट फाईल पोलीस स्टेशन ला अकोट फाईल १६ शे प्लॉट येथील राहणारे अब्दुल मुजाहिद्दीन खान मोहोम्मद हमीद खान यांनी दिनांक ७ जुलै रोजी दिली. यांच्या घरासमोर लावलेली हिरो-होंडा कम्पनी ची एम एच ३० ए के ९३८३ ही दुचाकी चोरून नेल्याची तक्रार अकोट फाईल पोलीस स्टेशन ला दिली तक्रार दाखल झाल्या पासून अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम हे आपल्या कर्मचाऱ्यांन सह सदर प्रकरणाचा तपास करीत होते. ठाणेदार महेंद्र कदम यांना अकोट फाईल येथील नाना नगर परिसरातील एक युवक गाड्या चोरी करीत असल्याची माहिती मिळताच सदर तपास चक्र आरोपी कडे वळवले व अकोट फाईल येथील नाना नगर येथील रहिवासी दर्शन संजय गाडे या आरोपीस अटक केली. संजय गाडे यास अधिक विचापुस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तर दिले पण पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली असता सदर आरोपीने आपणच दुचाकी चोरली असल्याची कबुली दिली व सदर गाडी ही बोरगावमंजू येथे टाकून दिल्याची माहिती दिली पोलिसांनी घडनास्थळा वरून गाडी जप्त केली असून आरोपीस अटक करण्यात आली सदर आरोपीने अजून काही गाड्या चोरल्या आहेत का याचा तपास अकोट फाईल पोलीस करीत आहेत. तीन दिवसात तीन धडजेबाज कारवाई करणाऱ्या अकोट फाईल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षका मोनिका राउत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्ग दर्शनात psi नितीन सुशिर, हरिचचंद्र दाते, सुनील टोपकर, , संजय पांडे, श्रीकांत पवार, अस्लम शहा, शाम आठवे, राहुल चव्हाण, दिलीप इंगोले यांनी केली.