तेल्हारा(प्रतिनिधी)- आई ….आई हा शब्द कोणीतरी आपल्या तोंडून काढला तर आईचे महत्व सांगण्याची कोणालाही गरज नाही जेव्हा ती या जगात नाही तिच्या प्रति आपले काही देने आहे हे मनात ठेवून तेल्हारा येथे राहणाऱ्या देशमुख परिवाराने एक वेगळाच पायंडा पाळत आईची तेरव्याचा कार्यक्रम रद्द करून होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला.
तालुक्यातील ग्राम अकोली रुपराव येथील रहिवासी तसेच सद्या तेल्हारा येथे राहणारे कृष्णराव देशमुख यांच्या पत्नीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले.तेरव्याचा अनावश्यक खर्च टाळून समजा समोर एक आदर्श ठेवत स्व. कल्पनाताई कृष्णराव देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ कृष्णराव देशमुख ,प्रा. नितीन कृष्णराव देशमुख,सागर देशमुख अकोलीकर यांनी तेरवी कार्यक्रम रद्द करून तेरवी साठी होणारा खर्च हा गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून शहरातील श्री शिवाजी हायस्कूल शाळेला रूपये एक्कावन हजाराचा चा चेक शाळेला प्रदान केला तसेच धारणी येथे नोकरी करिता असलेले नितीन देशमुख यांच्या वसंतराव नाईक विद्यालय येथे सुद्धा एक्कावन हजाराचा धनादेश येत्या काही दिवसात होतकरू विद्यार्थ्यांच्या हितासाठी देण्याचे आज श्रद्धांजली कार्यक्रमावेळी सांगितले.या श्रद्धाजंली कार्यक्रम ला उपस्थित मध्ये नितीन देशमुख ठाणेदार तेल्हारा,सुधीरबापू देशमुख सदस्य शाळा समिती, नानासाहेब देशमुख तुदगावकर,गोपाळराव खेडकर महाविद्यालय प्राचार्य गोपाल ढोले ,गजानन देशमुख,जितेंद्र देशमुख प्रा.भैयासाहेब देशमुख, प्रा नितीन देशमुख, शांतीकुमार सावरकर, एस टी.वंजारी, बी.जी.पवार श्रीकांत सपकाळ उपस्थित होते.