करोना कालावधीमध्ये ऑनलाइन वर्ग भरत असल्याने आता मुलांना अनेक पालक मोबाईल फोन घेऊन देत आहेत. असं असतानाच गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका मुलीने अभ्यासाठी पालकांनी घेऊन दिलेल्या फोनचा असा काही वापर केला की तिच्या पालकांना हृदयविकाराचा झटकाच आला.
झालं असं की शहरातील एका १५ वर्षीय मुलीला ऑनलाइन क्लासला हजेरी लावता यावी म्हणून तिच्या पालकांनी स्मार्टफोन घेऊन दिला. मात्र या मुलीने या फोनवरुन स्वत:चे न्यूड सेल्फी क्लिक करुन सोशल मीडियावर अपलोड केले. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी स्वत: तर आपले अश्लील फोटो अपलोड करायचीच पण तिच्या चुलत बहिणीलाही असं करायला सांगत होती. याबद्दल तिच्या पालकांना समजल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
मुलीने केलेला प्रकार पाहून तिच्या पालकांनी १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. समोपदेशन करणाऱ्यांना या मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तिला वेगळ्या रुममध्ये बसून ऑनलाइन क्लासमध्ये अभ्यास करता यावा म्हणून फोन घेऊन दिलेला. मात्र आपली ही मुलगी तिच्या गुप्तांगाचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत होती असं या पालकांनी समोपदेश करणाऱ्यांना सांगितलं. तिने स्वत:चे न्यूड फोटो तर ऑनलाइन पोस्ट केलेच शिवाय ती तिच्या समवयस्कर चुलत बिहणीलाही अशापद्धतीने फोटो अपलोड करायला सांगत असल्याचंही पालकांनी म्हटलं आहे.
या मुलीच्या पालकांना त्यांच्या नातेवाईकांनी तुमची मुलगी आमच्या मुलीला कशापद्धतीचे मेसेज पाठवले आणि कसे फोटो अपलोड करते याबद्दल सांगितलं. मुलीने केलेल्या कृत्यासंदर्भात ऐकून आणि तिने अपलोड केलेले फोटो पाहून तिच्या आई-वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. दोघांवरही उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.
समोपदेशन करणाऱ्यांनी या मुलीला तू करत असलेलं कृत्य हे सायबर गुन्ह्यांअंतर्गत येतं असं सांगत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर या मुलीने इथून पुढे आपण केवळ पालकांसमोरच फोनचा वापर करु असं आश्वासन दिलं. समोपदेशनानंतर या मुलीने तिचं सोशल मीडिया अकाऊंट आणि त्यावरील सर्व फोटो डिलीट करुन यापुढे फोन केवळ अभ्यासासाठी वापरणार असल्याचा शब्द दिला.