अकोला- तालुक्यातील हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने ती एचआयव्ही बाधित झाली होती.या गंभीर बाबीची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
तालुक्यातल्या हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, या बाबत अतिशय गंभीर दखल घेतली आहे. एका लहान मुलीला पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रक्त देण्यात आलं होतं यासंदर्भात फुड ड्रग्ज अथारिटी (एफडीए) व स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत येत्या दोन तीन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होईल त्या नुसार कारवाई केल्या जाईल. ब्लड बँकेने रक्तदात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करुन रक्त स्विकारणे आवश्यक होते त्याच बरोबर ज्या खासगी रुग्णालयात त्या बालीकेचा उपचार सुरु होता त्या रुग्णालयाने रक्ताची सॅम्पल टेस्ट करणे आवश्यक होते यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते याची पुर्ण चौकशी करु कठोर कारवाई करण्यात येईल.