अकोला– युनिसेफ, महिला आर्थिक विकास महामंडळ व लोकसंचालित साधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोवीड-19 जनजागृती व मास्क विक्री शिबीराचे आयोजन आज करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिला बचत गटाकरीता स्वंय रोजगार कार्यक्रमाअंतर्गत मास्क विक्री करण्यात आले. तसेच याशिबीरामध्ये सॅनिटायझर व मास्क वापरणे, लसीकरण जनजागृती कार्यक्रम व रोजगार संधी, महास्वंयम नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण व शासकीय योजनाची माहिती देण्यात आली.
महिला बचत गटाना मास्क शिलाईचे काम देवून स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. सीएमआरसीच्या शिबीरासाठी गटाच्या दोन महिलांची निवड करुन रोजगार उपलब्ध करून दिल्या जात आहे. उपक्रमाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळ विभागाच्या विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार तर कार्यक्रमाला जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक निखील पोहकार, चेतन काळे, दिनेश शर्मा आदि उपस्थित होते.